Nandadeep Netralay

+91 92-2000-1000

Lazy Eye - डोळे आळशी होत आहेत...! हा
आजार नेमका काय असतो?

Nandadeep eye hospital lazy eye treatment

तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अॅम्ब्लिओपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अम्ब्लिओपिया (आळशी डोळा) हा एक प्रादुर्भावामुळे आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामुळे जवळपास 15 ते 20 टक्के लहान मुले ग्रस्त आहेत. लेझी आय म्हणजे आपला एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी काही कारणास्तव कमी होते व डोळा आळशी होतो.

अलीकडच्याकाळात अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडताना दिसत आहेत. त्यापैकी आळशी डोळा(अम्ब्लोपिया) ही डोळ्यांची एक समस्या आहे. पण डोळा आळशी होतो म्हणजे नेमके काय होत? हा त्रास लहान मुलांनाच का होतो ?तो होण्यामागची कारणे आणि उपचार या सगळ्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

मेंदू

जेव्हा आपल्या डोळ्याकडून येणाऱ्या  सांकेतकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा कमी पाहण्याच्या लागलेल्या सवयीमुळे डोळा आळशी होतो. तिरळेपणाजाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लिओपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अम्ब्लिओपिया (आळशी डोळा) हा एक प्रादुर्भावामुळे आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामुळे जवळपास 5 ते 10 टक्के लहान मुले ग्रस्त आहेत.

लेझी आय म्हणजे
आपला एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी काही कारणास्तव कमी होते व डोळा आळशी होतो. डोळा बऱ्याचदा दिसायला सामान्य असतो पण चष्मा देऊनही या डोळ्याच्या नजरेत सुधारणा होत नाही. आळशी डोळा हा विकार लहानपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याची शक्यता जास्त असते.
 

डोळा आळशी होण्याची कारणे

  1. तिरळेपणा
  2. दोन डोळयातील चष्म्याच्यानंबरमधील फरक
  3.  जन्मजात किंवा बालपणीचामोतिबिंदू
  4. बुबुळाची अपारदर्शकता
  5.  पापणी खचणे / पडणे 

डोळा आळशी होतो म्हणजे नेमके काय?

आळशी झालेला डोळा शरीररचनेनुसार आणि बांधणीनुसार अनेकदा सामान्य असतो  जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये फरक असतो तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तर तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूला पाठवल्या जातात.त्यामधील तिरळ्या असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच अस्पष्ट असते ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते वडोळा आळशी बनतो. 

उपचार काय

लवकर उपचार न केल्यास हा आजार कायमचा जडतो व नंतर कोणतेही उपचार करून दृष्टी परत मिळवता येत नाही किंवा सामान्य होत नाही.लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो. आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे आणि रुग्णास दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.

नंदादीप नेत्रालयमध्ये या आजारांच्या रुग्णांसाठी वरदान असलेले आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे व्हिजन थेरपी उपचार उपलब्ध आहे या आधी या विकारावर पर्यायी  पद्धतीचा वापर करून चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी काम करणारा डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे हा पर्याय उपलब्ध होता.याशिवाय आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जातेमोतीबिंदूपापणी खचलेली असल्यास त्यावर योग्य ते उपचार वेळीच घ्यावेत. 

व्हिजन थेरपी  काय

कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे व्हिजन थेरपी. व्हिजन थेरपी विनाऑपरेशन करण्यात येणारा उपचार आहे. हा डोळ्यांसाठी करण्यात येणारा फिजिओथेरपी उपचार आहे. चष्मा वापरूनही जे दृष्टिदोष सुधारता येत नाहीत, असे अनेक प्रकारचे दृष्टिदोष सुधारता येतात. व्हिजन थेरपी डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी केली जाते. साधारणत: अशा प्रकारची गरज लहान मुलांपासून ते कोणत्याही वयातील माणसास होऊ शकते.

पॅचिंग म्हणजे काय

सामान्यडोळयास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस पॅचिंग असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते. सुरुवातीला पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत परंतु दृष्टीत सुधारणा होत राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो. पट्टी लावणा-या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांना वरचेवर तपासणी करत राहणे आवश्यक आहे.