Latest News

सांगलीचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. पटवर्धन यांचे सुसज्ज व अद्ययावत नंदादीप नेत्रालयाच्या इचलकरंजी शाखेचा शुभारंभ इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी नंदादीप नेत्रालयचे संस्थापक डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन, डॉ. सौरभ पटवर्धन, डॉ. निधी पटवर्धन, कुशल पटवर्धन, कांचन पटवर्धन, डॉ. प्रसन्न आराध्ये,

डॉ. आकाश राऊत, डॉ. प्रियांका गणगे आदी उपस्थित होते. यावेळी आवाडे म्हणाले, नंदादीप नेत्रालय हे १९८० पासून उत्तम नेत्रसेवा देणारे नेत्रालय आहे. सांगलीसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, बेळगाव, विटा आदी ठिकाणी शाखा विस्तारलेल्या आहेत.

इचलकरंजी शाखेच्या व्यवस्थापिका डॉ. शारदा हातुंजे, मार्केटिंग विभागाचे प्रमुख जावेद बिजापुरे यांनी सूत्रसंचालन केले. अनुजा पाटील यांनी आभार मानले.

ichalkaranji inauguration 1
ichalkaranji inauguration 3
ichalkaranji inauguration 8
ichalkaranji inauguration 6
ichalkaranji inauguration 5
ichalkaranji inauguration 2
ichalkaranji inauguration 7