आज आपण बघणार आहोत की बऱ्याच लोकांना आपला चष्मा घालवावा अशी इच्छा असते, चष्म्याचा नंबरची गरज न लागावी. काम करत असताना, खेळत असताना किंवा आपल्या आवडत्या छंदांना वेळ देत असताना चष्मा हा एक मोठा अडथळा ठरतो. पण आता या समस्यांवर कायमचे तोडगा शक्य झाला आहे. त्यासाठी काही लेसर ऑपरेशन उपलब्ध आहेत. आपण लेसर ऑपरेशनच्या माध्यमातून आपला चष्मा कायमचा काढून टाकण्याच्या विविध पर्यायांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
तर सगळ्यात प्रचलित किंवा बऱ्याच वर्षापासून चालत आलेले लेझर ऑपरेशन त्याला लासिक असे नाव आहे आणि हे अर्थात तुम्हा सगळ्यांनाच माहित असेल. या शास्त्रक्रियेत आम्ही विशिष्ट ब्लेड च्या साहाय्याने ज्याला आम्ही मायक्रो केरयटो म्हणतो, त्याने बुबुळाचे पातळ पापुद्रा तयार करतो. आणि त्यानंतर आपल्याकडे एक एकसायमेर लेझर असत म्हणजे लयासिक च मशीन त्यांन आपण या पापुद्र्याच्या खाली लेसर करून हे बुबुळ जे आहे त्याचा कारवेचर चेंज करत असतो. हि प्रक्रिया लासिक द्वारे होते आणि ही सगळ्यात पूर्वीपासून चालत आलेली एक पद्धत आहे. ती अजून सुद्धा वापरली जाते. आता जसा वेळ गेला तसा त्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा होत गेल्या. लासिक उपचार आजून सुध्या बऱ्याच पेशंटना केला जातो आणि जवळजवळ संपूर्ण ९७% ते ९८% लोकांचा नंबर हा पूर्ण जातो. अगदी एक दोन टक्के लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो.
डोळ्यांचा कोरडेपणा. सुरुवातीच्या काळात असतो लासिक झाल्यानंतर पण पुढच्या तीन ते सहा महिन्यांमध्ये जसजसे आपण औषध घेतो तसतसा हा जो त्याचा कोरडेपणा हा कमी होत जातो. दृष्टी सांगायचा तर हे लासिक झाल्याझाल्या दुसऱ्या दिवशीपासून सुस्पष्टता येते आणि एका आठवड्यामध्ये ती बऱ्यापैकी सुस्पष्ट होऊन जाते आणि त्यानंतर आपण सर्वच कामाला लागू शकतो.
1.फेम्टो लासिक:
आता बऱ्याच पाश्चिमात्य देशांमध्ये हीच पद्धती लासिक म्हणून ओळखली जाते. यामध्ये आपण फेम्टो लेसर च्या साहाय्याने पापुद्रा तयार करतो त्यामुळे रुग्णला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ब्लेडलेस लासिक किंवा फेम्टो लासिक हा लसिकाचा अडवान्स प्रकार आहे. ज्या मध्ये आपण ब्लेड च्या ऐवजी फेम्टो लेसर चा वापर करतो. फेम्टोसेकंड लेझरचा वापर करून डोळ्याच्या कर्णिकेत (कॉर्निया) एक सूक्ष्म कपाट तयार केले जाते. नंतर, एक्सीमर लेझरचा वापर करून कर्णिकेचा आकार बदलला जातो, ज्यामुळे दृष्टीदोष सुधारतो. यामध्येही संपूर्ण ९७% ते ९८% लोकांचा नंबर हा पूर्ण जातो. अगदी एक दोन टक्के लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो.
फेम्टो लसीकचे फायदे:
2. स्माईल लसीक:
हे डोळ्याच्या दृष्टीदोष सुधारण्याची एक आधुनिक शस्त्रक्रिया पद्धत आहे. या पद्धतीत, डोळ्याच्या कर्णिका (कॉर्निया) मध्ये एक सूक्ष्म छिद्र तयार केले जाते आणि लेझरचा वापर करून कर्णिकेचे आकार बदलून दृष्टीदोष दूर केला जातो. या पद्धतीमुळे कमी वेळ आणि कमी वेदना असते आणि डोळ्याच्या बऱ्यापैकी जलद पुनर्प्राप्ती होते.
स्माईल लसीकचे फायदे:
3. कृत्रिम आयपीसीएल:
कस्टम मेड IPCL म्हणजे डोळ्याच्या दृष्टीदोष सुधारण्यासाठी वापरली जाणारी एक प्रकारची कृत्रिम लेन्स आहे जी प्रत्येक रुग्णासाठी विशेषतः तयार केली जाते. आयपीसीएलचा पूर्ण नाव Implantable Phakic Contact Lens आहे.
कस्टम मेड आयपीसीएलचे फायदे:
4. ट्रान्स PRK:
ट्रान्स पीआरके हे डोळ्याच्या दृष्टीदोष सुधारण्याची एक आधुनिक, स्पर्शरहित लेझर शस्त्रक्रिया पद्धत आहे. या पद्धतीत, डोळ्याच्या बाह्य पातळ थराला (एपिथेलियम) स्पर्श न करताच लेझरचा वापर करून त्याचे काही भाग काढून टाकले जाते आणि नंतर उर्वरित कर्णिकेचा आकार बदलला जातो. यामुळे दृष्टी स्पष्ट होते.
ट्रान्स पीआरकेचे फायदे:
आपण पाहिलं की, चष्म्याच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आजकाल अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लासिक, फेम्टो लासिक, स्माईल लसीक आणि कृत्रिम आयपीसीएल सारख्या विविध पद्धतींचा वापर करून आपण आपली दृष्टी स्पष्ट करू शकतो. कोणती पद्धत तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी नेत्रतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
नंदादीप नेत्रालय, सांगली आपल्याला या सर्व पद्धतींचा वापर करून सर्वोत्तम सेवा पुरवते. आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि स्पष्ट दृष्टी मिळवण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.