Latest News
बिंदू चौक सबजेलमध्ये कैद्यांची नेत्र तपासणी
कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलमधील कैद्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. बुधवारी (दि. २४) कारागृह प्रशासन आणि नंदादीप नेत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात १३२ पुरुष आणि सहा महिला कैद्यांच्या डोळ्यांची तपासणी करून गरजूंना चष्मे देण्यात आले. डॉ. प्रसन्न आराध्ये, व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांच्यासह इतरांनी कैद्यांची नेत्र तपासणी केली.
कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलमध्ये न्यायालयीन कैद्यांच्या डोळ्यांच्या समस्या निवारणासाठी आणि त्यांना गरज भासल्यास चष्मा उपलब्ध व्हावा, यासाठी बुधवारी नंदादीप नेत्रालयाच्या वतीने शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ६ महिला बंदी व १३२ पुरुष बंदींच्या डोळ्यांची तपासणी एआर मशिनद्वारे झाली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील बहुतांशी कारागृहातील बंदींच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले जात आहे. शहरातील नामवंत नंदादीप नेत्रालयाच्या वतीने डॉ. प्रसन्न आराध्ये, व्यवस्थापक रवींद्र मोहिते व इतर सहकारी यांची शिबिरात उपस्थिती होती. प्रभारी अधीक्षक ए.डी. खैरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांनी डोळ्यांची निगा कशी राखायची, हे सांगितले. यावेळी हवालदार इजाज शेख यांच्यासह कारागृहातील अन्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.