Latest News

नंदादीप आय हॉस्पिटलच्या बैलहोंगल शाखेमध्ये पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

नंदादीप आय हॉस्पिटलच्या बैलहोंगल शाखेमध्ये पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी
बैलहोंगल, २५ जानेवारी २०२५ – नंदादीप आय हॉस्पिटलच्या बैलहोंगल शाखेमध्ये आज पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
गेली ४४ वर्षे सांगलीतील सुप्रसिद्ध डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप आय हॉस्पिटल हे नेत्रचिकित्सा क्षेत्रात मोलाची कामगिरी पार पाडत आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी नेत्रतज्ज्ञ आणि अद्यावत सेवा सुविधा यामुळे नंदादीप आय हॉस्पिटलच्या बैलहोंगल शाखेला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
बैलहोंगल शाखेत आज दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. नंदादीप आय हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना एम. पाटील यांनी ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली, यावेळी डॉ. ज्योत्स्ना पाटील यांना OT इंचार्ज – श्री. आनंद तुप्पड, OT सहाय्यक – श्री. सागर बदिगेर, श्री. चन्नाबास , श्री. मल्लीकर वण्णूर, प्रशासक – श्री. इरय्या मस्तमर्डी, ऑप्टोमेट्रिस्ट – श्री. शिवशरण बेट्टाड, कर्मचारी – सौ. पूजा पाटील, आणि सौ. ऐश्वर्या यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी डॉक्टर आणि सर्व स्टाफचे आभार मानले. आणि जास्तीत जास्त लोकांनी या सेवा सुविधाचा लाभ घेण्यास सांगू असेही ते म्हणाले.
नंदादीप आय हॉस्पिटलने बैलहोंगल शहरात उपलब्ध केलेल्या या अत्याधुनिक सेवा सुविधाचा बैलहोंगल शहरातील सर्वसामान्यांना लाभ होत आहे, तसेच डोळ्यांच्या अनेक रोगांवर आधुनिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
नंदादीप आय हॉस्पिटल
बैलहोंगल शाखा
फोन: 9175219319
वेबसाइट: nandadeyehospital.org
ही यशस्वी शस्त्रक्रिया प्रगतीची एक नवीन सुरुवात आहे.
अधिक अपडेटसाठी आमच्याबरोबर राहा!