कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंदादीप नेत्रालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. कारागृहातील बंदीजनांच्या डोळ्यांची, तपासणी करून उपचार केले. प्र. अधीक्षक, व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांनी मार्गदर्शन केले. कारागृहातील ७ महिला बंदी व १२३ पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला. प्रभारी अधीक्षक ए. डी. खैरे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी कारागृह अधिकारी, नंदादीप नेत्रालयाचे डॉ. प्रसन्न आराध्ये, रवींद्र, मोहिते आदी उपस्थित होते.