मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लेन्स कसे निवडावे?

आज आपण बघणार आहोत आपण जी लेन्स बसवणार आहोत म्हणजे तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन जे ठरलंय आणि ऑपरेशन नंतर आपण जी लेन्स बसवणार आहे ती कशी निवडायची?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेन्सची निवड तुमच्या गरजेनुसार झाली पाहिजे म्हणजे तुमची काय गरज आहे हे ओळखून आपल्याला लेन्स निवडली पाहिजे. आपले जे समुपदेशक असतात ते तुम्हाला सांगतातच कि वेगवेगळ्या लेन्सेस उपलबध्द आहेत तर तुम्हाला कुठली योग्य आहे ते तुम्ही ठरवा तर आपण ठरवायचं कशावरून तर आपलं काम जे आपण करतो ते कुठल्या पद्धतीचं आहे.

म्हणजे एखादा आय टी प्रोफेशनल आहे किंवा बँकर आहे त्याच्या कामाच्या वेळी तो वेगवेगळ्या अंतरावरती काम करत असतो जसं एखादा कॉम्पुटरचा जास्त वापर करत असतो, एखादा डॉक्टर किंवा सर्जन असेल ते खूप जवळच काम करतो, शिक्षकांचं काम थोडं वेगळं असतं, शेतात काम करण्याऱ्यांचं अंतर जे हे कामाचं अंतर हे वेगवेगळं असतं आणि त्यांच्या गरजही वेगळ्या असतात जसं एखाद्याला दिवसभर बाहेर उन्हामध्ये काम करायचं असतं त्याला मुख्यतः बारीक गोष्टी बघायच्या असतात किंवा लांबच्याही बघायच्या असतात, एखाद्याला रात्री गाडी चालवायची गरज असते, एखाद्याला फॅक्टरी मध्ये आतच काम करायचं असत अशा प्रत्येकाच्या गरजेनुसार आपल्याला लेन्स निवडली पाहिजे.

ज्यावेळी आम्ही म्हणतो की तुम्हाला आपण दृष्टी म्हणतो की 6/6 किंवा आपल्याला सगळं स्पष्ट दिसतंय पण त्याच्यामध्ये तीन भाग
असतात आपल्या दृष्टीचे तर सगळ्यात पहिला भाग जो असतो आपण ज्याला 6/6 व्हिजन म्हणतो ती जनरली डिस्टन्स म्हणजे अंतरावरची यालाच डिस्टन्स व्हिजन म्हणतात म्हणजे साधारणतः १३ फूट पासून पलीकडे हे सगळं डिस्टन्स व्हिजनमध्ये जमा होतं आणि थोडक्यात आपण जरएखाद्या रोडवर चाललोय किंवा ड्रायव्हिंग करते वेळी जे आपल्याला लांबच सगळं दिसतं किंवा खोलीत सुद्धा आपण टीव्ही बघतो लांबच जे दिसतं त्याला डिस्टन्स व्हिजन म्हणतात.
त्यानंतर दुसरा भाग असतो तो नियर व्हिजन म्हणजे जवळचं हे साधारण आपल्या वाचनाच्या अंतरावर असतं साधारणतः १६ इंच म्हणजे एक दीड फुटावर आपण धरून साधारण वाचत असतो तर हा जो भाग आपल्या दृष्टीचा असतो त्याला म्हणतात नियर व्हिजन किंवा जवळची दृष्टी आणि या दोन्हीच्या मध्ये इंटरमीडिएट व्हिजन असते इंटरमीडिएट व्हिजन ही थोडीशी दूर म्हणजे जवळची व्हिजन जर या अंतरावर असेल तर इंटरमीडिएट व्हिजन ही हाताच्या अंतरावर म्हणजे थोडीशी दूर असते.
साधारणतः 26 इंच म्हणजे दोन अडीच फुटाच्या पलीकडे ही इंटरमीडिएट व्हिजन असते आणि आजकाल या इंटरमीडिएट व्हिजनचा वापर वाढलाय
कारण आपल्याला माहिती आहे आपण कॉम्प्युटर खूप वापरतो आणि डेस्कटॉप नव्हे तर इव्हन टॅबलेट्स वापरतो आय पॅड्स वापरतो या सगळ्यामध्ये इंटरमीडिएट व्हिजनचा वापर जास्त होतो तसेच गृहिणी असतात त्या ज्यावेळी स्वयंपाक करतात त्यावेळी आपण काही जवळ धरून काही गोष्टी करत नाही तर त्यावेळी सुद्धा इंटरमीडिएट व्हिजन म्हणजे थोडासा हाताच्या अंतरापर्यंत जास्त वापरतो तर आपली रिक्वायरमेंट याच्यामधली कुठली आहे हे ठरवून आपल्याला त्यानुसार लेन्सची चॉईस करायची आहे.
Cataract Surgery - Lens
तर एक थोडक्यात उदाहरण देतो आता याच्यामध्ये एक दृष्टी दाखवलेली आहे की ही जी व्यक्ती ती बाळाला घेऊन उभी आहे आणि बाळाचा चेहरा त्या व्यक्तीला क्लिअर दिसतोय याचा अर्थ तिची जवळची दृष्टी क्लिअर आहे पण बाळ जसं दूर जाईल तशी तिची दृष्टी थोडीशी अंधूक होते म्हणजे तिची नियर व्हिजन चांगली आहे पण इंटरमीडिएट व्हिजन ही कमी आहे आणि या व्यक्तीची इंटरमीडिएट व्हिजन म्हणजे आपण ज्यावेळी दरवाजा किल्लीने उघडतोय किंवा आपण
स्वयंपाक करतोय त्यावेळी इंटरमीडिएट व्हिजन या व्यक्तीची क्लिअर आहे पण जवळ धरल्यावर मात्र ते कमी दिसतं म्हणजे प्रत्येकाची दृष्टी नियर आणि इंटरमीडिएटला ही वेगळी असू शकते त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण लेन्स बसवतो तर ही नियर आणि इंटरमीडिएट व्हिजन दृष्टी ही वेगवेगळी येऊ शकते.
आपल्याला मुख्यतः चार प्रकारच्या लेन्सेस म्हणजे जर ओव्हरऑल प्रकार बघितले तर चार प्रकारच्या लेन्सेस उपलब्ध असतात त्यामध्ये मोनोफोकल आहे मल्टीफोकल आहे एक्सटेंडेड फोकस आहे आणि टोरिक आहे. टोरिक जी असते ही सर्व प्रकारात मिळते. म्हणजे टोरिक ती मोनोफोकल ही असू शकते मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल किंवा एक्सटेंशनचा फोकस सुद्धा असू शकते.
आता आपण एकेका लेन्स विषयी जास्ती माहिती करून घेऊया मोनोफोकल ही बेसिकली स्टॅंडर्ड लेन्स म्हणजे कुठल्याही पेशंटला जर त्यांनी कुठली वेगळी लेन्स चॉईस नाही केली तर त्याचा जो स्टॅंडर्ड नॅचरल चॉईस असतो तो मोनोफोकल लेन्सचा. मोनोफोकलचा अर्थ त्याला एकच फोकस असतो आणि जनरली आपण ज्यावेळी ही लेन्स वापरतो किंवा डॉक्टर बसवतात तर आपण असं पाहतो की या व्यक्तीला दूरचा चश्मा कमीत कमी लागूदे म्हणजे ज्यावेळी तो दूरच्या गोष्टीपासून तर त्याला स्पष्ट दिसाव्यात तर हा एक त्याचा अडवांटेज आहे की या लेन्स मध्ये जी दृष्टीची सुस्पष्टता आहे ती सगळ्यात चांगली असते त्याचं कारण मोनोफोकल लेन्स मध्ये कुठल्याच रिंग्स वगैरे काही नसतात आणि त्यामुळे जो काही लाईट येतोय दुरून तो आपल्या पडद्यावर एकत्र फोकस होत असतो त्यामुळे क्लॅरिटी सगळ्यात जास्त या मोनोफोकलला मिळते मग तुम्ही म्हणाल की याला जर क्लॅरिटी सगळ्यात जास्त असेल तर आपण सगळ्याच पेशंटना हीच का लेन्स आपण चॉईस देत नाही किंवा करायला सांगत नाही?
त्याचा एक मेन डिसएडवांटेज असा आहे की मगाशी आपण सांगितलं की डिस्टन्स व्हिजन आहे इंटरमीडिएट व्हिजन आहे आणि जवळची दृष्टी आहे तर याच्यामध्ये फक्त डिस्टन्स व्हिजन याच्यामध्ये कव्हर होते पण इंटरमीडिएट व्हिजन किंवा जवळची नियर व्हिजन ही कव्हर होत नाही त्यामुळे अशा व्यक्तीला कायमच जवळच्या कुठल्याही कामासाठी चश्मा लागतो याच्यावर उपाय म्हणून नेक्स्ट लेन्स आली त्याला मल्टीफोकल म्हणतात आणि मल्टीफोकल मध्येच ऍडव्हान्स लेन्स बाय ट्रायफोकल या ट्रायफोकल लेन्स मध्ये काय केलं गेलं की यात या लेन्स मध्ये रिंग्स दिल्या गेल्या आणि या रिंग्सच्या साह्याने दूरचाच नव्हे तर जवळच्या वस्तू सुद्धा आता डोळ्यावर फोकस होऊ शकतात तर या प्रकारे ही जी लेन्स आहे ती काम करते या रिंग्सच्या थ्रू लांबचा आणि जवळचा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या पडद्यावर फोकस होतात त्यामुळे व्यक्तीला दूरच नव्हे तर जवळचही दिसू शकतं.
या लेन्सचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते पण याच्यात एक प्रमुख आता तुम्ही हे ही म्हणाल की सगळ्यांनाच आपण ट्रायफोकल का वापरत नाही किंवा ते वापरण्याचा सल्ला का देत नाही की याला तर सगळंच दिसते लांबचं जवळचं पण याच्यामध्ये एक विशिष्ट याचा डिसएडवांटेज आहे तो म्हणजे रात्रीच्या वेळी कुठलीही लाईट असेल तर त्याभोवती आपल्याला ही वलय दिसतात यालाच आपण ग्लेयर्स हॅलोज असेही म्हणतो आणि त्यामुळे याचेही जसे फायदे आहेत तसे काही डिसएडवांटेज आहेत. त्यामुळे ट्रायफोकलचे मुख्यतः फायदे काय आहेत एक तर जवळचं इंटरमीडिएट व्हिजन आणि डिस्टन्स तिन्ही चांगलं दिसतं आणि हा सगळ्यात जास्त एडवांटेज या ट्रायफोकलचा आहे पण त्याबरोबर जे मी सांगितलं ग्लेअर्स म्हणजे लाईट असेल तर त्याच्यावरती वलय दिसणं हा त्याचा डिसएडवांटेज आहे.
मग हा डिसएडवांटेज कमी यावा म्हणून एक एक्सटेंडेड फोकस लेन्स म्हणजे मोनोफोकल आणि ट्रायफोकल याच्या मधली एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स आली आहे आणि या लेन्सचे फायदे काय आहेत तर ज्यांना नाईटला म्हणजे रात्री ड्राईव्ह करायचं असेल पण त्याच वेळी मला थोडसं वाचायला पण दिसलं पाहिजे कमीत कमी इंटरमीडिएट व्हिजनला तर त्यांना ही एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस वापरता येते मात्र खूप जवळ ज्यावेळी आपल्याला बघायचं असतं त्यावेळी मात्र एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस मध्ये आपल्याला चश्मा हा लावावा लागतो.
तर आपण जर पाहिलं की म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल आतापर्यंत ही मोनोफोकली स्टॅंडर्ड लेन्स आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच चश्मा लावावा लागतो जवळच्यासाठी ट्रायफोकल मध्ये आपल्याला जवळचा चश्मा सुद्धा काही वेळा लागत नाही किंवा लावावा लागत नाही जवळ जवळ 95% लोकांना ज्यावेळी आम्ही लेन्स वापरतो तर त्यांना चश्म्याची गरज लागत नाही ज्यावेळी आम्ही दोन्ही डोळ्याचे हे ट्रायफोकल लेन्स करतो त्यावेळी रिझल्ट बेटर असतात त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी आम्ही जे रिझल्ट सांगतो हे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावरचे असतात कारण काही रुग्ण असं म्हणतात की एका डोळ्याचं झाल्यावर त्यांना थोडसं कमी दिसतंय किंवा अजून मला क्लिअर एवढं दिसत नाही पण ज्यावेळी आपण दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करतो त्यावेळी या ट्रायफोकल लेन्सची सर्व अडवांटेजेस आहेत ते येतात.
एकाच डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर मात्र काही वेळा चश्मा लागतो याला अजून एक जो डिसएडवांटेज आहे की ट्रायफोकलला आपल्याला ब्राईट लाईट लागतो म्हणजे वाचन करताना जर खूप कमी लाईट असेल किंवा डीम लाईट असेल तर आपल्याला वाचता येत नाही आपल्याला ब्राईट लाईट लागतो याला ग्लेयर्स हॅलो मी मगाशी सांगितलं तसे असतात.
एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स मध्ये काय होतं की याच्यातले ग्लेयर्स हॅलो कमी झालेले असतात तुलनेने परंतु याचे जे वर्किंग डिस्टन्स आहे थोडसं लांब असतं म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ फोकस लेन्स बसवली तर आपल्याला खूप जवळचं दिसत नाही पण लांब धरलं तर दिसून जातं याला खूप बारीक वाचायला चश्मा लागतो रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करणाऱ्यांना जास्त सोयीस्कर असतं म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ फोकस लावला असेल तर त्यांना नाईट ड्रायव्हिंग हे ट्रायफोकल लावलेल्या पेशंट पेक्षा जास्त सहजरित्या करता येतं तर हे फरक आहेत ट्रायफोकल आणि एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस मध्ये त्यामुळे हि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ठरवते आमच्या दृष्टीने की आम्ही ज्यावेळी पेशंटला सल्ला देतो की ट्रायफोकल का एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस तर ते आहे नाईट ड्रायव्हिंग.
Cataract Surgery - Lens
तर थोडक्यात दाखवायचं झालं तर हि उजव्या बाजूची ही जी इमेज आहे ती ज्यावेळी आपण ट्रायफोकल बसवतो पेशंटना आणि समजा ती व्यक्ती रात्री गाडी चालवते तर तुम्हाला दिसत असेल की लाईटची ही वलय दिसतात अशा प्रकारे त्या व्यक्तीला दिसतं.
एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स मध्ये हे तुलनेनं बरच कमी असतं थोडसं लाईट तरी स्प्रेड होतो पण जनरली ड्रायव्हिंगला प्रॉब्लेम येत नाही तर यावर आम्ही ठरवतो की त्या व्यक्तीला एक्सटेंडेड ऑफ फोकस ट्राय करायची का.
आता मगाशी मी थोडक्यात सांगितलं टोरिक लेन्स विषयी हे टोरिक लेन्स काय काम करते तर आपला जो बुबुळ आहे त्याची वक्रता असते, प्रत्येका बुबुळाला एक वक्रता असते तो एकदम नॉर्मल गोल नसतो आणि काही वेळा एका बाजूला तो जास्ती बेंड झालेला असतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे चश्म्यामध्ये सिलेंड्रिकल नंबर येतो तो याच्यामुळे टोरिक लेन्सच्या साह्याने आपण हा सिलेंड्रिकल नंबर बेसिकली कमी करत असतो.
त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर, आम्ही काय पाहतो की टोरिक लेन्सची गरज आहे की नाही जर टोरिक लेन्सची गरज असेल तर या टोरिक लेन्स सर्व प्रकारात उपलब्ध आहेत म्हणजे ती मोनोफोकल पण असते मल्टीफोकल, ट्रायफोकल पण असते आणि इडॉक्स सुद्धा असते त्यातली कुठल्याही प्रकारामध्ये मात्र जर रुग्णाला जर टोरिक लेन्सची गरज असेल तर तीच बसवावी या व्हिडिओत आपण थोडक्यात बघूया ही टोरिक लेन्स कशी काम करते तर आपला जो बुबुळ आहे ते नॉर्मली म्हणजे नॉर्मली हे गोल असायला पाहिजे पूर्ण स्फेरिकल पण ते असतं कसं तर ते बेंड असतं एका बाजूला ते जास्त वक्र असतं किंवा जास्त फ्लॅट असतं आणि ही वक्रता एका बाजूला जास्त असेल तर तुम्हाला माहिती आहे की हे लाईट रेज त्याप्रमाणे बेंड होतात आणि त्यामुळे क्लॅरिटी जी आहे दृष्टीची ती कमी होते ज्यावेळी आम्ही या पेशंटचा मेजरमेंट करतो. ऑपरेशनच्या आधी त्यावेळी आम्हाला दिसून येतं की या पेशंटला टोरिक लेन्सची गरज आहे आणि मग त्यानुसार आम्ही ऍडव्हाइस करून त्या पेशंटला सुटेबल अशीही लेन्स मागवतो आणि ती वापरतो. जर समजा या व्यक्तीला टोरिक ची गरज आहे पण आपण ती करेक्ट नाही केली तर काय होतं चष्म्याशिवाय या व्यक्तीला नेहमीच अंधुक दिसतं आणि त्याला करेक्शन करायचं असेल तर आम्हाला नक्की चश्मा द्यावा लागतो. त्यामुळे चश्म्यानेच फक्त हे मग करेक्ट होऊ शकत त्यामुळे जर टोरिक लेन्स आपण वापरली तर मग चश्म्याची गरज पुन्हा कमी होऊन जाते.