नवजात काचबिंदू: तज्ञांकडून लवकर ओळख आणि उपचार जाणून घ्या
आज आपण एका खूप मनोरंजक विषयाची माहिती घेणार आहोत. तो म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा काचबिंदू. लहान मुलांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे काचबिंदू आसतात. त्यामध्ये पहिला आहे तो Congenital Glaucoma, हा बाळ जन्मल्यानंतर लगेचच लक्षात येतं कि आपल्या बाळाला काचबिंदू आहे. दुसरा आहे तो Infantile Glaucoma त्याच्यात काय होतं जन्मल्यापासून ते तीन वर्षापर्यंत आपल्याला लक्षात येतं की या बाळाला काचबिंदू आहे आणि त्याच्या नंतरच एक आहे जे 3 वर्षानंतर ते 16 वर्षापर्यंत नाहीतर कधी कधी 35 वर्षापर्यंत आपल्याला लक्षात येतं की ह्यांना काचबिंदू आहे सो त्या ग्रुपला Juvenile Glaucoma म्हणतात. आपण आज त्याचीच माहिती घेणार आहोत
3 वर्षानंतर ते 16 आणि 35 वर्षापर्यंत, त्या श्रेणीमधील मुलांमध्ये जे काचबिंदू होतं त्याला Juvenile Glaucoma म्हणतात. हा जो काजबिंदू आहे हा कोणात होतो हा ज्यांचा मायनस नंबर जास्त आहे, ज्यांना आपण मायोप्स म्हणतो यांच्यात होतो. ज्यांना हेरिडिटी आहे म्हणजे घरी कोणाला आहे काचबिंदू असल्या मुलांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. हा काचबिंदू कोणालाही होवू शकतो.
ह्याच्यात आता लक्षणं काय असतात, लहान मुलांमध्ये तर याचं लक्षणं काय असतात, पहिलं तर लक्षणं काहीच नसतात, हेच तर खूप घातक आहे की ह्याच्यात लक्षण काही नसताना. म्हणजेच तुमची नस खराब होत चालली आहे आणि तुम्हाला हे लक्षात सुद्धा नाही. आणि दुसरं एखादं लक्षण असू शकतं की तुमचं डोकं दुखत. आणि तुम्ही सगळीकडे दाखवलंय तरी तुम्हाला त्याचा काही उपचार भेटत नाहीये. तर हे कशासाठी असू शकतं की तुमच्या डोळ्याचा दाब वाढलाय आणि त्याच्यामुळे डोकं दुखी होते आणि नजर कमी होते, पण नजर कशी कमी होते कि केंद्र दृष्टी जी असते ती तशीच असते आजूबाजूची नजर हळूहळू कमी होते.
ह्याच्यामुळे काय करावं लागणार आहे, तुम्ही कुठल्याही वयाचे ग्रुपचे पेशंट असाल, तर पहिले दर सहा महिन्यातून एकदा तरी तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना नक्कीच भेट द्या आणि तुमचं डोळ्याचा दाब काय आहे, डोळ्याची नस कशी आहे, हे सगळं लक्षात घ्या.
आता आपण जाणून घेऊयात की काचबिंदू होतो कसा? आपला डोळा आहे ज्याला बाहेरचा भाग ज्याला आपण भूगोळ म्हणतो, आणि बाहुली त्या दोन्ही मध्ये एक कोन असतो आणि आपल्या डोळ्यातला जो द्रव तयार होतो ज्याला आपण ऍक्विअस ह्युमर म्हणतो. तो इथे तयार होऊन या बाहुलीच्या मधून जागेतून या कोन मध्ये जातो. त्या कोन मध्ये त्याला काही अडथळा निर्माण होतो, त्याला ट्रॅबक्युलर मेशवकअसे म्हणतात. त्या ट्रॅबॅक्युलर मेशवक मध्ये ती एक जाळी असते, जशी चहा गाळायची गाळणी जशी असते तशी तिथे जाळी जाळीचे रचना असते, त्याला आपण ट्रॅव्ह्युलर मेशवक म्हणतो. जे पाणी द्रव जे तयार होतं त्या कोनामधून बाहेर जायला पाहिजे, समजा ते गेलंच नाही तर डोळ्यांतील नसांवर हा दाब पडतो. त्यामुळे जी नस मेंदूशी जुळलेली आहे ती सुकत जाते. हे जर एकदा काही सुकले तर तर कायमची नजर जाते.
तुम्हाला काच बिंदूचे लक्षणे असतील, आणि तुम्ही आता डोळ्यांचे डॉक्टर कडे आलात. आता डॉक्टर काय काय करतील, तुम्हाला पहिली तर तुमची नजर तपासतील, आपल्याला यामध्ये फारस काही कळून येणार नाही कारण तुमचं जे तुम्ही बघत आहात ती तुमची केंद्र दृष्टी हि बरोबरच असणार आहे. मग तुमचं डोळयातील दाब बघितला जाईल. काहीवेळी डोळ्याचा तणाव जास्त येईल काहीवेळी हा नियमित येईल.
शेवटी तुमची बाहुली मोठी करून तुमचा पडदा चेक केला जातो आणि त्याच्यात तंतोतंतपणे आपल्याला लक्षणं दिसतात की डोळ्याची नस सुकत चालली आहे. हे जर लक्षणं डॉक्टरांना कळाले तर ते पुढचे तुमचे उपचार सांगतील, त्यातलं महत्त्वाचं म्हणजे पेरिमेट्री. पेरिमेट्री मध्ये आपल्याला काय होतं की आजूबाजूची नजर तुमची गेली असेल ती कितपत गेली आहे हे समजत. मग तुमचं पॅकीमेट्री म्हणजे बुबुळाची जाडी आणि अजून एक टेस्ट आहे हिगोनियोस्कोपी म्हणजे तुमचे कोनाची रचना हे सगळं बघितलं जातं. ह्याच्यावर डॉक्टर ठरवतील की तुम्हाला कुठल्या प्रकारचा काचबिंदू आहे व त्यावर कोणते उपचार गरजेचे आहेत
जे आपण पाहत आहोत लहान मुलांमधील Juvenile Glaucoma, ह्याचं आता उपचार काय असणार आहेत. ह्याच्यात महत्वाचं तर जसं ड्रॉप्स घालून किंवा औषध घालून हे खूप नियंत्रणात येईल असल्यातला काचबिंदू नाहीये. याचा उपचार एकाच असणार आहे तो म्हणजे काचबिंदूची शस्त्रक्रिया. काचबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि त्याच्यात पण बरेचशे प्रकार आहेत, काय करायचं आहे ते तुमचे डॉक्टर ठरवतील. त्याचबरोबर ग्लॉकोमा ड्रेनेज डिव्हाइसेस पण आहेत ज्याच्याने आपण द्रव जो तयार होतो तो बाहेर जाण्यासाठी त्या उपकरणाचा वापर केला जातो.
जर असे काही लक्षणं असतील तर लवकरात लवकर नंदादीपला नेत्रालय भेट द्या. आमच्या बऱ्याचशा शाखा आहेत, आमचे कुठल्याही तुमच्या जवळपास शाखेला जाऊन तुमचं डोळ्याची तपासणी नक्कीच करून घ्या.
To read English version of this blog, click here