Case Study
Eye Laser Treatment On Baby
काल दिवस भरात मी जवळ जवळ 12 तास शस्त्रक्रिया केल्या .. त्यामध्ये मोतीबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया , मधुमेहाच्या पडद्याच्या जटिल शस्त्रक्रिया , इंजेक्शन्स इत्यादी होत्या. रात्री 8 वाजता एक 6 आठवड्याच्या बाळाचे दोन्ही डोळ्याचे लेसर केले. हे बाळ कर्ण नावाच्या सेवाभावी संस्थेमध्ये ऍडमिट होते. कारण जन्मल्यानंतर त्याला त्याच्या आई वडिलांनी सोडून दिले होते. अश्या बालकांची ही संस्था काळजी घेते. ९ महिन्याच्या आत जन्म झाल्याने (premature) त्या बाळाला पडद्याचा आजार झाला होता. नंदादीप मेडिकल केअर फौंडेशन अश्या बाळांना मोफत वैद्यकीय मदत देते. काल रात्री 8 ते 9 मध्ये हे लेसर मी केले. या सेवाभावी संस्थेतील कर्मचारी रात्री पर्यंत बाळाबरोबर थांबले. या बाळाचा आजार लवकर बरा होऊन त्याला निरोगी आनंददायी जीवन मिळावे हीच प्रार्थना…अश्या सेवेची आम्हाला संधी मिळते याबद्दल कृतज्ञता