Latest News
नंदादीप मध्ये 26 वर्षीय मधुमेहग्रस्ताची दृष्टी परत
सांगली : काही दिवसांपूर्वी २६ वर्षीय तरुणी दृष्टी कमी झाल्यामुळे ‘नंदादीप नेत्रालय’ मध्ये दाखवण्यासाठी आली होती. तिच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली असता लक्षात आले की, ही तरुणी गेल्या सोळा वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आहे. त्यामुळे या तरुणीला कमी वयामध्ये मोतीबिंदू झाला होता. त्यावर नंदादीप नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सौरभ पटवर्धन यांनी तिच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. खूप वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त असल्यामुळे या तरुणीच्या डोळ्यांच्या पडद्यांवर परिणाम झाला होता. मधुमेह अनियंत्रित असल्यामुळे या तरुणीच्या पडद्यांना सूज आली होती. त्यामुळे तरुणीच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. डॉ. पटवर्धन यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर तरुणीला पडद्यावरील इंजेक्शन देण्याचे निर्णय घेतला. या इंजेक्शन, उपचारानंतर या तरुणीची दृष्टी वाचवण्यात यश आले.
For an appointment call us at – +91- 92 2000 1000.