Latest News मुलांमधील डोळ्यांचे विकार रोखण्यासाठी नंदादीपचा नवीन उपक्रम बेलगावातील नंदादीप आय हॉस्पिटलतर्फे ‘नंदादीप मायोपिया क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला. लहान व किशोरवयीन मुलांमधील चष्म्याचा नंबर वाढू नये, यासाठी या क्लिनिकद्वारे योग्य तपासणी आणि नियंत्रणाची सुविधा देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. शैला पश्चापुरे, डॉ. अर्जुन बिज्जली, डॉ. सौरभ पटवर्धन, डॉ. निधी पटवर्धन, व डॉ. ज्योत्स्ना पाटील उपस्थित होते.