Latest News

नंदादीप आय हॉस्पिटलच्या विटा शाखेमध्ये पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

1st Cataract surgery at vita branch

दृष्टी म्हणजे नंदादीप…

सम्पर्क : 9220001000

नंदादीप आय हॉस्पिटलच्या विटा शाखेमध्ये पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी
गेली 42 वर्षे अखण्ड आणि अविरतपणे नेत्रचिकित्सा क्षेत्रात सांगलीचे सुप्रसिद्ध डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप आय हॉस्पिटल मोलाची कामगिरी पार पाडत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी नेत्रतज्ज्ञ आणि अद्यावत सेवा यामुळे अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता प्राप्त झालेल्या नंदादीप आय हॉस्पिटल च्या विटा शाखेमध्ये आज दिनांक 12 जुलै 2022 रोजी पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. नंदादीप आय हॉस्पिटल ने विटा शहरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे, तसेच डोळ्यांच्या अनेक रोगावरील नवनवीन आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे जनसामान्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नंदादीप आय हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. उमेश अमराळे यांनी विटा शाखेतील पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी डॉक्टर आणि सर्व स्टाफचे आभार मानले.
यावेळी डॉ. उमेश सरांना श्री. शुभम चव्हाण, श्री. संतोष, सौ. प्रिया कोळी आणि श्री. विक्रम पाण्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.