Latest News

पंजाबच्या परिषदेत नंदादीप नेत्रालयाच्या डॉक्टरांच्या डंका

Dr. Sourabh D. Patwardhan and Dr. Nidhi S. Patwardhan at Punjab conference

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंजाब अमृतसर येथे झालेल्या इंडियन इंट्रा ओक्युलर अँड रिक्रॅक्टिव्ह सोसायटी परिषदेत नंदादीप नेत्रालयाच्या डॉक्टरांनी डंका वाजवला. यामध्ये नंदादीप नेत्रालय सांगलीमधून डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन, डॉ. निधी सौरभ पटवर्धन यांनी सहभाग घेतला होता.

पटवर्धन यांनी नेत्र शस्त्रक्रियेची माहिती आणि चित्रीकरण सादर केले. यासाठी त्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. डॉ. सौरभ यांच्या व्हिडीओस सर्वोत्कृष्ट व्हिडीओसाठी बक्षीस मिळाले. डॉ. निधी यांना सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ पुरस्कार आणि रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात अमृतसरमध्ये ऑप्थैल्मिक परिषद होते. येथे प्रख्यात परदेशी नेत्रतज्ज्ञ व शल्यचिकित्सक सदस्यांना त्यांचे अनुभव सादरीकरण करण्याची संधी मिळते. यंदा १२ ते १६ जानेवारी दरम्यान परिषद झाली. परिषदेत जगप्रसिद्ध शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रियेचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवले. नंदादीप नेत्रालयाचे संचालक नेत्रतज्ज्ञ डॉ. सौरभ पटवर्धन. डॉ. निधी दरम्यान, सध्या डॉ. सौरभ यांच्या यूट्यूब चॅनलवर देश-विदेशांतील १४००० हून अधिक नेत्ररोग तज्ज्ञांचा समावेश आहे. यामधून नेत्ररोग तज्ज्ञांना संशोधनात्मक नवनवीन गोष्टी ते शिकवितात. नंदादीप नेत्रालयामध्ये अमेरिका, इंग्लंड, बल्गेरिया, रुमानिया, इराक, मोरोक्को, फिलिपिन्स अशा अनेक देशांतून नेत्रतज्ज्ञ शस्त्रक्रिया शिकण्यासाठी येत असतात.