Latest News

नंदादीपचे डॉ. सौरभ पटवर्धन यांना सर्वोत्कृष्ट पेपर सादरीकरण पुरस्कार

Dr. Sourabh D. Patwardhan Awarded for Best Paper presentation

नंदादीपचे डॉ. सौरभ पटवर्धन यांना सर्वोत्कृष्ट पेपर सादरीकरण पुरस्कार

सांगली : पुढारी वृत्तसेवा कोची येथे झालेल्या डॉक्टरांच्या अखिल भारतीय नेत्रविज्ञान परिषदेत येथील नंदादीप आय हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉ. सौरभ पटवर्धन यांना सर्वोत्कृष्ट पेपर सादरीकरण पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीही त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील सर्वोत्कृष्ट व्हिडिओचा पुरस्कार मिळाला होता.

प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी सुरू केलेल्या नंदादीप नेत्रालयाचा वारसा आता डॉ. सौरभ पटवर्धन हे चालवत आहेत. त्यांच्या शाखांचा विस्तार सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, पुणे या जिल्ह्यातही झाला आहे. देशातील नेत्रतज्ज्ञांची वर्षातून एकदा परिषद होत असते. या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या पेपरला हा पुरस्कार मिळाला आहे.

नंदादीप नेत्रालय सांगली येथे पदव्युत्तर (डीएनबी, डीओएमएस) शिक्षण दिले जाते. या विभागात शिकणारे डॉ. अंकिता सांगळे व डॉ. निलंबिका कुलकर्णी यांनी या नेत्रातज्ज्ञांच्या परिषदेमध्ये आंतरदेशीय वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतला. यात १८ प्रतिस्पर्धी यांच्यावर मात करून भविष्यातील शिक्षक हा किताब मिळवला. या दोघींना डॉ. निधी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune and Mulund with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment
Visit – www.nandadeepeyehospital.org for more information.
Facebook – www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram – www.instagram.com/nandadeep_eye_hospital/
Email – nandadeepeyehospital@gmail.com