Latest News

डॉ. सौरभ पटवर्धन यांचे राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण

Dr. Sourabh D. Patwardhan at National Assembly
सांगली : मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय डॉ. सौरभ पटवर्धन नेत्रतज्ज्ञ परिषदेत सांगलीतील डॉ. पटवर्धन नंदादीप नेत्रालयाचे संचालक डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन यांनी नेत्रशस्त्रक्रियांचे सादरीकरण केले. यासाठी त्यांना विविध बक्षिसांनी गौरविण्यात आले. या अखिल भारतीय परिषदेत १० हजार नेत्ररोग तज्ज्ञांनी भाग घेतला होता. देश-विदेशातील नेत्ररोग तज्ज्ञांनी गुंतागुंतीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे असंख्य व्हिडीओ स्पर्धेसाठी पाठविले होते. यात डॉ. पटवर्धन यांच्या ‘किंग ऑफ थ्रोन’ या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे व क्लिष्ट अशा नेत्रशस्त्रक्रियेच्या व्हिडीओस दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. डॉ. सौरभ यांनी विविध नऊ वेबिनारमध्ये वक्ता व परीक्षक म्हणून सहभाग घेतला. डॉ. पटवर्धन हे देश-विदेशातील १२हजारनेत्ररोगतज्ज्ञांना संशोधनात्मक नवनवीन गोष्टींचे मार्गदर्शन करतात. नंदादीप नेत्रालयात अमेरिका, इंग्लंड, बल्गेरिया, रूमानिया, इराक, मोरोक्को, फिलिपाईन्स् आदी विविध देशांतून नेत्रतज्ज्ञ शस्त्रक्रिया शिकण्यासाठी येत असतात. डॉ. पटवर्धन म्हणाले, या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय आहे. पदवी ऑप्टोमेटरी शिक्षणाची सुविधा आहे. असंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. डॉ. पटवर्धन यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे भारतात व विदेशातही सांगलीचे नाव प्रसिद्ध झाले आहे. या यशाबद्दल डॉ. सौरभ पटवर्धन यांचे अनेकांनी अभिनंदन केले.