Latest News

नंदादीप नेत्रालयातर्फे वूमेन्स मंथला रत्नागिरीतील महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद

Nandadeep Eye Hospital Women Month

रत्नागिरी, १९ मार्च (वार्ताहर): ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलांसाठी हा दि. १ मार्च ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी नंदादीप नेत्रालयाकडून प्राथमिक नेत्रतपासणी विनामुल्य करण्यात आली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त नंदादीप नेत्रालय रत्नागिरी येथे बचत गट महिलांसाठी ८ मार्च २०२४ रोजी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बचत गट महिला वर्ग व टी. डब्लू. जे. कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांनी उत्फूर्त सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. रश्मी खेडेकर यांनी उपस्थित सर्व महिला वर्गाचे समाजातील योगदानासाठी नंदादीप परिवारातर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांचे आभार मानले.

नंदादीप नेत्रालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त वूमेन्स कट मंथचे आयोजनामार्फत डोळ्यांची न तपासणीमध्ये डोळ्यांचा नंबर, डोळ्यांचे प्रेशर व डोळ्यांमध्ये झालेले बदल यांचे निदान करण्यात येणार असून सदर तपासणीसाठी वयोमर्यादा नसेल. अशा या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा. असे आव्हान नंदादीप परिवारातर्फे मुख्य चिकित्सक डॉ. निकुंज भट्ट यांनी केले आहे.

महिला दिनानिमित्त आयोजित शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवताना नंदादीप नेत्रालयच्या व्यवस्थापक संचालिका डॉ. रश्मी खेडेकर.