Latest News
जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्लतर्फे कार्यक्रम

कोल्हापूर : जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल आणि डॉ. पटवर्धन यांचे + नंदादीप नेत्रालय यांच्यातर्फे किशोर देशपांडे यांच्या सावली केअर सेंटर येथे ५५ वर्षांवरील सर्वांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर घेतले. सावली केअर सेंटरमधील ८२ जणांनी लाभ घेतला. ‘सावली’चे देशपांडे आणि त्यांच्या चमुने सहकार्य केले. सावली केअर सेंटरच्या सरस्वती कला मंचच्या नवीन स्टेजवर जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल संचलित ‘उत्सव स्वरांचा आणि तालांचा’ हा मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला. देशपांडे आणि येथील काही रुग्णांनी सहभाग घेतला. रवींद्र मेस्त्री यांचा वाढदिवस तसेच सौ. व श्री. मेस्त्री यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. ‘पर्ल ग्रुप’चे सुरेश खांडेकर, सदाशिव खतकल्ले, रवींद्र मेस्त्री, सूर्यकांत मोरे, सुजाता मोरे, रत्नमाला शिंदे, राधा मेस्त्री, मार्गेश पाटील, संजय नाकील, रावसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.