Latest News

संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शिबीराला उदंड प्रतिसाद

Unique Foundation Arranged Eye Checkup with

संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शिबीराला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी शहरातील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ या संस्थेच्या वतीने व नंदादीप नेत्रालय रत्नागिरी यांचे सहकार्याने शनिवारी घेण्यात आलेल्या नेत्र शिबीराला उदंड प्रतिसाद मिळाला.यावेळी शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनी ही या शिबीराचा लाभ घेतला.दिवसभर आयोजित केलेल्या या शिबिरात 85 नागरिकांनी लाभ घेतला.या शिबीरात डोळे तपासून नंबर देण्यात आले तसेच डोळ्यांचे प्रेशर तपासणी करुन आजारा बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नंदादीप नेत्रालय च्या प्रिती बसंत राज , नंदादीप नेत्रालय चे इरशाद मुकादम सह हॉस्पिटल चे डाॅक्टर व से
स्टाफ यांनी मेहनत घेवुन शिबीर यशस्वी केले.
मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष व भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांचे हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी एनजीओ चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, कांचन मालगुंडकर, उपसचिव निलेश नार्वेकर,आशादीप संस्थेचे अध्यक्ष व एनजीओ चे सल्लागार दिलीप रेडकर, डॉ चंद्रशेखर जोशी, विलास सावंत, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब खोराटे, पत्रकार व एनजीओ चे जिल्हा संघटक जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माइल नाकाडे, इरफान शहा,सादीक भाई,,बावा खान,हाशीम इब्जी यांचेसह एनजीओ चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी आभार मानून भविष्यात अशाच प्रकारे विविध विषयांवर शिबीरे, मार्गदर्शन कार्यक्रम राबवू असे आवाहन करत नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा असे ही आवाहन केले.प्रसंगी कोणाला तातडीने सहकार्य हवे असल्यास एनजीओ आपल्या सोबत सतत राहील असे सांगितले.