Latest News नेत्रदान दिनी नंदादीपचा संकल्प - अंधत्वाकडून प्रकाशाकडे अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी आम्ही एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल उचललं.नेत्रदान दिनाच्या निमित्ताने, नंदादीप आय हॉस्पिटल, कोल्हापूर शाखेतर्फे नेत्रदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं.“नेत्रदान – श्रेष्ठ दान” अशा बॅनर्ससह रस्त्यावरून निघालेली ही रॅली एक महत्त्वाचा संदेश देत होती –आपल्या एका निर्णयामुळे कोणीतरी जग पाहू शकतं.नेत्रदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि अंधत्वावर मात करणं आपल्या हातात आहे, हे सांगणं हाच रॅलीचा उद्देश होता.