Latest News
कळंबा कारागृहात नेत्र तपासणी शिबिर
कोल्हापूरः स्वातंत्र्य दिनानिमित्त कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची नेत्र तपासणी शिबिर झाले. शिबिरात २५० कैद्यांची व कारागृहातील ७५ अधिकारी- कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. नंदादीप नेत्रालयातर्फे ही तपासणी करण्यात आली. डॉ. प्रसन्न आराध्ये यांच्यातर्फे तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आली. डोळे येण्याची साथ ही एकमेकांच्या सहवासात आल्यामुळे पसरते असा गैरसमज आहे. या पाश्र्वभूमीवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या वेळी नंदादीप नेत्रालयाचे व्यवस्थापक रवींद्र मोहिते, जनसंपर्क अधिकारी शिरीष पाटील, यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते.