Latest News

कळंबा कारागृहात अडीचशे कैद्यांची नेत्रचिकित्सा

Eye checkup news in Lokmat Nandadeep Eye Hospital

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कळंबा कारागृहात कैदी आणि कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सोमवारी (दि. १४) झालेल्या शिबिरात २५० कैद्यांसह ७५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. नंदादीप नेत्रालयचे नेत्रचिकित्सक डॉ. प्रसन्न आराध्ये आणि त्यांच्या पथकाने कैद्यांची नेत्र तपासणी केली. आवश्यकतेनुसार कैद्यांना चष्मे पुरवले जाणार आहेत. यावेळी नंदादीप नेत्रालयाचे व्यवस्थापक रवींद्र मोहिते, कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, वरिष्ठ कारागृह अधिकारी चंद्रशेखर देवकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.