Latest News

लोकक्लप फौडेशन, नंदादीपतर्फे नेत्र मार्गदर्शन शिबिर.

Lokkalp Foundation and Nandadeep arranged free eye checkup
बेळगाव खेड्यातील लोकांमध्ये शहरी लोकांपेक्षा आपल्या नेत्र चिकित्सेबद्दल कमी जागरूकता असते. कोणीतरी पुढे येऊन या लोकांना त्यांच्या नेत्र चिकित्सेच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे खूप महत्त्वाचे आहे. ही गोष्ट पुढे नेण्यासाठी लोककल्प फाऊंडेशनने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सी.एस. आर. उपक्रमांतर्गत डॉ. पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्र रुग्णालय बेळगावच्यावतीने २ मे रोजी जांबोटी येथे नेत्रशिबिर आयोजित केले होते.
या नेत्र शिबिराच्या आयोजनामागील मुख्य उद्देश जनजागृती करणे हा होता. खेड्यातील लोकांमध्ये डोळ्यांची काळजी घेण्याचे शिक्षण, संपूर्ण नेत्रतपासणी, वैद्यकीय सेवा आदी बाबतीत या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला जांबोटी येथील शेकडो रहिवासी उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामे दत्तक खेड्यातून राबविण्यात येत आहेत. या नेत्र तपासणी शिबिरात पद्मावती के. रेमण्णावर, प्रिती जैस्वार, आनंद तुप्पड, शारीक नाईक, सागर गोब्बुर, अमित कटवा, संतोष कदम, सुहासिनी पेडणेकर, निखिल अर्जुनवाडकर आणि प्रितेश पोटेकर यांची उपस्थिती होती

दृष्टी म्हणजे नंदादीप…!
संपर्क :- 92-2000-1000