Latest News

नंदादीप मध्ये आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेस प्रतिसाद..

International Eye Conference at Nandadeep Eye Hospital

देश-विदेशातील दीडशेहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग

सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगलीतील डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय यांच्या वतीने देश- विदेशातील नेत्रतज्ज्ञांना आधुनिक तंत्रज्ञान नवनवीन शस्त्रक्रिया कौशल्य यांची ओळख करून देण्यासाठी डॉक्टर सौरभ पटवर्धन यांनी फेकोटीप्स् ३.० या नेत्र परिषदेचे आयोजन केले होते. याला देश-विदेशातील १५० हुन अधिक नेत्र तज्ज्ञ उपस्थित होते. तसेच जगभरातून १०० पेक्षा जास्त तज्ज्ञांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

नेत्र तज्ज्ञांसाठी अत्याधुनिक शत्रक्रिया आणि डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियामध्ये वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचे ३डी गॉगल्स आणि ३डी प्रणालीचा वापर करून थेट प्रक्षेपणाद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. डॉ. सौरभ पटवर्धन, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. दीपक मेगुर, डॉ. भारती मेगुर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. ब्राझीलचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नेटो रोसाटेल्ल्ली आणि डॉ. लुकान मिश्चेव्ह यांनी ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे त्यांच्या शत्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर केले. डॉ. सौरभ पटवर्धन, डॉ. दीपक मॅगुर, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. भारती मेगुर, डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन, डॉ. प्रसत्र आराध्ये, डॉ. उमेश अमराळे यांचे मार्गदर्शन लाभले.