Latest News
Activity Organised By Tanishka. Free Eye Check Up Camp Conducted By Nandadeep Eye Hospital Kolhapur.
'तनिष्का'तर्फे कसबा बीडला मोफत डोळे तपासणी शिबिर:
कसबा बीड, ता. १८ : सकाळ नेहमीच
पर्यावरण वाचविण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते.. बदललेली जीवनशैली, वातावरणात होणारे बदल, आणि मोबाईल व संगणकाचा अतिवापर यामुळे डोळ्यांना त्रास होणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचाच एक भाग म्हणून येथील तनिष्का व्यासपीठ, कसबा बीड ग्रामपंचायत व नंदादीप नेत्रालय कोल्हापूरतर्फे कसबा बीड येथे मोफत डोळे तपासणी शिबिर झाले. १०० हून अधिक महिलांची डोळे तपासणी केली.
महादेव मंदिरात सरपंच सत्यजीत पाटील, उपसरपंच व तनिष्का गटप्रमुख वैशाली सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. तनिष्का गटप्रमुख वैशाली पाटील व जयश्री कांबळे या उपस्थित होत्या. यावेळी मोतीबिंदू, डोळ्या पाठीमागील पडदा, काचबिंदू नेत्र उपचार आदी तपासण्या केल्या. मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना नंदादीप रुग्णालयातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले तनिष्का गट समन्वयक राजेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पाटील डी. एम. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
@Location :- Kasba Beed, Maharashtra 416011
For any further assistance feel free to contact us:
Nandadeep eye hospital,
Near trade center, Dattawad Renaissance, 1st floor, 334 E ward, shahupuri, Kolhapur. 416001.
Mobile:7588084999, 9220001000
Landline:0231_2668819 /20
You can visit us on 👇website : https://nandadeep.com