Latest News

Free Eye Check Up Camp Conducted By Nandadeep Eye Hospital Kolhapur.

Narke School student's eye checkup- Nandadeep
पन्हाळा : डोळे तपासणीवेळी संदीप नरके, एस. जी. फर्नांडीस, आर. एस. भाटिया, अभिषेक पोतदार, डॉ. राहूल आरबुने, डॉ. सोनाली मयेकर, डॉ. संदीप बोहिया, डॉ. मयुरी पाटील आणि विद्यार्थी.

नरकेज् स्कूलमध्ये डोळे तपासणी :

कोल्हापूर , ता. २१ पन्हाळा येथील नरकेज पन्हाळा कॉलेजमध्ये ‘सकाळ’च्या ‘एनआयई’ परिवारातर्फे झालेल्या डोळे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नंदादीप आय हॉस्पिटलच्या वतीने येथील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी झाली. डोळे चांगले ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर कमी करावा, टीव्ही दूर अंतरावरून कमी प्रमाणात पहा, अॅलर्जी असल्यास धुळीपासून दूर रहा, आहारात पालेभाज्यांवर अधिक भर द्यावा, अशा टीप्स देण्यात आल्या. संस्थेचे चेअरमन संदीप नरके, प्राचार्य एस. जी. फर्नांडीस, आर. एस. भाटिया, अभिषेक पोतदार आदींच्या उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. नंदादीप आय हॉस्पिटलचे डॉ. राहूल आरबुने, डॉ. सोनाली मयेकर, डॉ. संदीप बोहिया, डॉ. मयुरी पाटील यांनी तपासणी केली. एनआयई समन्वयक उदय माळी यांनी संयोजन केले.

आळशी डोळा ‘आळशी डोळा’ या नेत्र विकाराचे लक्षण असे आहे की, एका डोळ्याचा नंबर जास्त होतो आणि दुसरा डोळा तंदुरूस्त (अॅक्टिव्ह) असतो. त्यामुळे एक डोळा कमी पहात असल्याने दुसऱ्या डोळ्यावर ताण पडतो आणि नंबर वाढतो. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष होतो. त्यामुळे वय वाढेल तसे या तक्रारी गंभीर होत जातात, असेही यावेळी तज्ञांनी सांगितले.

#21st of January 2020.

@School name: – Narakes Panhala Public School & Jr. College, Panhala
Address: Panhala Rd, Budhwar Peth, Panhala, Maharashtra 416201

For any further assistance feel free to contact us:
Nandadeep eye hospital, Near trade center, Dattawad Renaissance, 1st floor, 334 E ward, shahupuri, Kolhapur. 416001.
Mobile:7588084999,  9220001000
Landline:0231_2668819 /20
You can visit us on 👇website : https://nandadeep.com