Latest News
Free Eye Check Up Camp Conducted By Nandadeep Eye Hospital Kolhapur.
आठशे विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी सकाळ एनआयई उपक्रम; नंदादीप नेत्रालयातर्फे तपासणी :
कोल्हापूर, ता. २६ सकाळ एनआयई उपक्रमांर्तगत नंदादीप नेत्रालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. यात प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सुमारे ८०० विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले. एनआयईतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. या अंर्तगत नेत्रतपासणी केली.
नंदादीप नेत्रालयातर्फे डोळे तपासणीबरोबर डोळ्यांचे विकार व खबरदारी याविषयी माहिती देण्यात आली. अलीकडच्या काळात मुलांना चष्मे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. १० पैकी ३ मुलांना चष्म्याचा नंबर लागतो, असेही दिसत आहेत. त्यामुळे वेळीच तपासणी व डोळ्यांची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
डोळे चांगले ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर कमी करावा, टीव्ही दूर अंतरावर कमी प्रमाणात पाहावा, अलर्जी असल्यास धुळीकणापासून दूर राहणे किंवा धुळीत जास्त वेळ खेळणे मुलांनी टाळणे आवश्यक आहे, तसेच जेवणात पालेभाज्या जास्त खाव्यात, विशेषतः गाजर खावे, तिरळेपणा टाळण्यासाठी नेत्र तपासणी वेळीच करणे गरजेचे आहे. आदीप्रकारची माहिती नेत्रवैद्यकीय पथकाने दिली.
या तपासणीत डॉ. शुभम चव्हाण, धणेश मोघे, राहुल अर्बुणे, लवकुमार, सीमा शिंगाडे यांनी काम पाहिले, तर प्रायव्हेट हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. आर. गोरे, उपमुख्याध्यापक व्ही. एल. डेळेकर, पर्यवेक्षक श्रीमती ए. पी. चिटणिस, शिक्षक व्ही. पी. शिंदे व आर. एन. कुंभार आदीनीं सहकार्य केले.
#26th of December 2019.
Activity organised by sakal NIE organization.
Free eye check up camp conducted by Nandadeep Eye Hospital Kolhapur.
@School name :- Private High School.
Address :- Near Khau Galli, Mangalwar Peth, Kolhapur 416012
For any further assistance feel free to contact us:
Nandadeep eye hospital,
Near trade center, Dattawad Renaissance, 1st floor, 334 E ward, shahupuri, Kolhapur.
416001.
Mobile:7588084999,
9220001000
Landline:0231_2668819 /20