Latest News
नंदादीपतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम

कोल्हापूर : नंदादीप नेत्रालयाने हाती अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेतलेल्या आणखी एक अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन सर्किट हाउस येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक मोफत नेत्र तपासणी उपक्रमात सर्किट हाऊस येथील ज्येष्ठ नागरिक संघाला आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी नंदादीप नेत्रालयाचे बुबुळतज्ज्ञ डॉ. प्रसन्न आराध्ये, डॉ. स्नेहा शिंदे, डॉ. रूचा पाटील, नेत्रपटलतज्ज्ञ डॉ. सचिन देसाई, आदी उपस्थित होते. 1) दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. प्रसन्न आराध्ये यांनी डोळ्यांची तपासणी करणे किती आवश्यक आहे. नियमित तपासणीमुळे पुढील धोके कशाप्रकारे टाळू शकतो, यावर मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. स्नेहा शिंदे यांनी मोतीबिंदू व काचबिंदूबाबत माहिती दिली. तसेच नंदादीपमधील दिली. डॉ. सचिन देसाई यांनी डायबेटीस (मधुमेह) असलेल्यांना रेटिना (पडद्याच्या) तपासणीचे महत्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख लक्ष्मण डूके यांनी नंदादीपच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर नंदादीप कोल्हापूरचे व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांनी नंदादीप नेत्रालयाविषयी माहिती दिली. तसेच या योजनेत दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ५५ वर्षांवरील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करणार असून आवश्यक त्या तपासण्या व उपचार सवलतीच्या दरात देणार असल्याचे सांगितले. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी (५५ वर्षावरील) लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन सीमा शिंगरे व आभार मयुरी पाटील यांनी मानले.