Latest News

नंदादीप हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर
ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

  • बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सदस्यांसाठी नंदादीप हॉस्पिटलने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले. 
  • या शिबिराचा ५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
  • शिबिराचे उद्घाटन विश्वास धुरीजी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हॉस्पिटलचे सचिव सुरेंद्र देसाई, संचालक रघुनाथ मुतालिक, विजय वाईरडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
  • नंदादीपच्या कार्याध्यक्षा व नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.