Latest News

नंदादीप नेत्रालय व देवकीनंदन फाउंडेशन यांच्यावतीने विशेष नेत्र तपासणी मोहीम

  • सांगली, २१ मार्च २०२५ – महिला दिनाचे औचित्य साधून नंदादीप नेत्रालय आणि देवकीनंदन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला व नेत्र आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
  • या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला. देवकीनंदन फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.
  • कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या नेत्र आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.