Latest News

नंदादीप नेत्रालयाच्या वतीने 1 ते 28 फेबरुवारीपर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Nandadeep arranged free eye checkup
कोल्हापूर : नंदादीप नेत्रालयाच्या वतीने १ ते २८ फेब्रवारीपर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापुरातील ट्रेड सेंटर येथील नंदादीप नेत्रालयात गेली चार वर्षे डोळ्यांचे निदान व उपचार यावर अद्ययावत सेवा देण्यात येत असून, मुख्य शाखा सांगली येथे गेली ४१ वर्षे कार्यरत आहे. कोल्हापूर शाखेत चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याचे आजार, तिरळेपणा, डोळ्यांचा कोरडेपणा, पापणीचे आजार, डोळ्यांचा नंबर या व अशा अनेक समस्यांवर निदान व उपचार केले जात आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपण डोळ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहोत. डोळ्यावर मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्हीमुळे येणारा ताण वाढला आहे. डोळ्यांच्या असंख्य समस्या रुग्णाला भेडसावत असल्याने या सर्वांचा विचार करून सामाजिक बांधिलकीतून दि. १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी नंदादीप हॉस्पिटलमध्ये नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. हॉस्पिटलतर्फे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून काही रुग्णांवर उपचार हे सवलतीच्या दरात करण्यात येतील, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.