Latest News
सांगली शहराचे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दि. ३ व ४ रोजी जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नंदादीप नेत्रालयाच्या एस.टी. स्टैंड रस्ता पारेख मेडिकल समोरच्या शाखेत ही तपासणी होणार आहे. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. माधवी पटर्वधन यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे. परगावच्या पत्रकार आणि कुटुंबियांच्या सोयीसाठी शनिवार दि. ४ रोजीही नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
दृष्टी म्हणजे नंदादीप…!
संपर्क :- ९२-२०००-१०००
नंदादीप नेत्रालय तर्फे दि. ०३/१२/२०२१ व ०४/१२/२०२१ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सांगली शहराचे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर
शिबीर स्थळ:- नंदादीप नेत्रालय, सांगली स्टॅण्ड शाखा, पारेख मेडिकल समोर, सांगली.