Latest News
सांबरा आरोग्य तपासणी शिबिराचा 500 जणांना लाभ
सांबरा आरोग्य तपासणी शिबिराचा ५०० जणांना लाभ
बेळगाव : बसवेश्वर प्रवचन सेवा कमिटीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवारी आयोजित केले होते. याचा ५०० हून अधिक जणांनी लाभ घेतला. सांबरा, महादेवनगर येथील बसवेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. तारिहाळ अडवीसिद्धेश्वर मठाचे स्वामी अडवीश्वर आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, संजय पाटील, सुरेश देसाई, नीलकंठ देसाई, शिवगौडा देसाई, शिवनांद पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन केले. नवजीवन हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी करुन औषधाचे वितरण करण्यात आले. डॉ. सतीश चौलगेर, डॉ. श्रद्धा जाधव तपासणी केली. नंदादीप नेत्रालयाच्यावतीने डोळे तपासणी करण्यात आली. आनंद तुप्पद, पद्मावती के, पूजा पाटील, रवी मुडसे, सागर गब्बूर यांनी तपासणी केली. मलगौडा पाटील, प्रदीप पाटील, दत्ता हवालदार, प्रभाकर महाजन, ज्योती तिम्मापूरमठ, गीतांजली पाटील, द्राक्षायणी अंगडी उपस्थित होते.
सम्पर्क : 92 2000 1000