Latest News
डॉ. जी. डी. बापु लाड सहकारी साखर कारखाना आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी कुंडल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दृष्टी म्हणजे नंदादीप…
संपर्क 9220001000
नंदादीप नेत्रालय सांगली आणि क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापु लाड सहकारी साखर कारखाना आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी कुंडल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन विद्यमान आमदार श्री. अरूण लाड यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नंदादीप च्या सर्व स्टाफ सोबतच साखर कारखाना आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांनी मोलाचा सहभाग घेतला.
नंदादीप हॉस्पिटलच्या नेत्र तपासणी शिबिराला याठिकाणी सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला, या शिबिराचा कारखान्याचे कर्माचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा तीनशे पेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला.
गेली एक्केचाळीस वर्ष नंदादीप नेत्रालय रूग्णांची अविरत नेत्रसेवा करत आहे.
नंदादीप रूग्णांसाठी नेहमीच तत्पर आहेच आणि अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञान व उपचार देण्यास अग्रेसर आहे.
धन्यवाद…