Latest News

दिवाळीत फटाके उडवताना डोळ्यांची काळजी घ्या डॉ. सौरभ पटवर्धन

दिवाळीत फटाके उडवताना डोळ्यांची काळजी

 

सांगली, ता. ९ : दिवाळीत फटाके उडवताना डोळ्यांची काळजी घ्यावी.  फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास डोळा अधू होऊ शकतो किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे फटाके उडवताना पारदर्शक गॉगल घालावेत. विशेष करून लहान मुलांच्या डोळ्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सौरभ पटवर्धन यांनी केले.

नंदादीप नेत्रालयाचे संचालक डॉ. सौरभ पटवर्धन म्हणाले की, दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे आपण म्हणतो. मात्र याच दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाके उडवले जातात. त्यावेळी डोळ्यांची काळजी घेतली जात नाही. मात्र फटाक्यांमध्ये विस्फोटक पदार्थ असतात ते घातक असतात. काही वेळा मुले फटाके, झाड हातात घेऊन उडवतात. जर फटाके डोळ्याजवळ फुटले तर डोळा आयुष्यभरासाठी निकामी होऊ शकतो. कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे पालकांनी स्वतःच्या उपस्थितीत लहान मुलांना डोळ्याला पारदर्शक गॉगल घालून फटाके उडवण्याचे मार्गदर्शन करावे.

फटाके फुटल्यानंतर त्यातील स्फोटकाचे कण वेगाने शरीरावर आढळतात काही डोळ्यातही जातात अशा वेळी डोळ्याला गंभीर इजा होऊ शकते. हे टाळण्यासाठी डोळ्यांचे संरक्षण होण्याची गरज आहे.

डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्याचे रुग्ण पाहिले आहेत. डोळा शरीराचा महत्त्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. त्याला दुखापत झाल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे दिवाळीत फटाके उडवताना डोळ्याचे संरक्षण होण्यासाठी गॉगल वापरावेत, असे आवाहन त्यांनी केले. -डॉ. सौरभ पटवर्धन