Latest News
'Nandadeep' Dr. Honoring Saurabh Patwardhan
‘नंदादीप’चे डॉ. सौरभ पटवर्धन यांचा सन्मान
सांगली : आयएसएमएसआयसीएस या आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ज्ञांच्या परिषदेतर्फे नंदादीप आय हॉस्पिटलचे मेडिकल संचालक डॉ. सौरभ पटवर्धन यांना रायझिंग स्टार अवॉर्ड-२०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हैदराबाद येथे आयएसएमएसआयसीएस या आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ज्ञांची पाचवी द्वैवार्षिक जागतिक परिषद झाली. परिषदेत नंदादीप आय हॉस्पिटलचे मेडिकल संचालक डॉ. सौरभ पटवर्धन यांना ‘रायझिंग स्टार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. सौरभ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे डोळ्यांच्या आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार करतात. तसेच देशातील आणि परदेशातील अनेक डॉक्टर्सना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे डोळ्यांच्या आजारांवर उपचार करण्याचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन यांना रायझिंग स्टार अवॉर्ड-२०२३ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हैदराबाद येथे झालेल्या नेत्रतज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत नामांकित नेत्रतज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरणाचा सोहळा झाला.