Latest News
नंदादीप आय हॉस्पिटल बेळगावी शाखेचे प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न.
नंदादीप आय हॉस्पिटल बेळगावी शाखेचे प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न
गेली 42 वर्षे अखंड आणि अविरतपणे नेत्र चिकित्सा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञानासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेले संगलीचे सुप्रसिद्ध डॉ. दिलीप पटवर्धन यांचे नंदादीप आय हॉस्पिटलच्या बेळगावी शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नंदादीप आय हॉस्पिटल चे संस्थापक मा. डॉ. श्री. दिलीप पटवर्धन (आबा सर), डॉ. सौ. माधवी पटवर्धन मॅडम, डॉ. श्री. सौरभ पटवर्धन सर, डॉ.सौ.निधी पटवर्धन मॅडम, श्री. कुशल पटवर्धन सर, सौ. कांचन पटवर्धन मॅडम सहपरिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावी मधील नामवंत डॉ. श्री. एम. डी. दीक्षित (chief cardio vascular thoracic surgeon) आणि
डॉ. सौ. माधुरी दिक्षित मॅडम ( senior ophthalmic surgeon) उपस्थित होते. तसेच इतर सन्माननीय पाहुणे
डॉ. श्री. सदानंद पाटणे ( senior ophthalmic surgeon)
डॉ.सौ. राजश्री अनगोळ(senior pediatrician)
सौ. स्नेहा पी. वी. ( Deputy commissioner of police)
श्री. रवींद्र करलींगन्नावर ( senior assistant commissioner)
डॉ.श्री. शशिकांत मुंन्याल ( district health officer)
डॉ.श्री. सुधाकर ( District surgeon)
श्री. प्रभू यतनाट्टी (Advocate president bar association)
डॉ.श्री. रवी पाटील ( senior orthopedician) या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
नंदादीप विषयी बोलताना आजचे प्रमुख पाहुणे डॉ.श्री. एम. डी. दीक्षित सर यांनी त्यांच्या आणि डॉ. दिलीप पटवर्धन (आबा सर ) यांचे नातेसंबंधांची ओळख करून दिली, 1994 – 1995 मध्ये आबा सरांच्या भेटी बद्दल सांगत काही जुन्या आठवणींना उजाळा दिला, नंदादीप आय हॉस्पिटल मध्ये असलेल्या सेवा सुविधांचे त्यांनी कौतुक केले तसेच उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि नंदादीप आय हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ. श्री. सौरभ पटवर्धन यांनी नंदादीप आय हॉस्पिटलच्या दीर्घ प्रवासाबद्दल बोलून नंदादीप मध्ये उपलब्ध सेवा आणि सुविधां बद्दल माहिती दिली. तसेच नंदादीप हॉस्पिटलच्या बेळगावी शाखेच्या डॉक्टरांची आणि सर्व स्टाफची थोडक्यात ओळख करून दिली.
या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी नंदादीप आय हॉस्पिटलचे डॉ. ज्योत्स्ना पाटील मॅडम, डॉ. सज्जन संघाई सर, डॉ. स्नेहा शिंदे मॅडम, डॉ. सायन मुखर्जी सर, हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. विठ्ठल चव्हाण सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता डॉ. ज्योत्स्ना पाटील मॅडम आणि डॉ. सज्जन संघाई सर यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांचे आभार मानून केली.