Latest News
ऑप्टोमेट्री परीक्षेत 'नंदादीप'च्या विद्यार्थ्यांचे यश
ऑप्टोमेट्री परीक्षेत ‘नंदादीप’च्या विद्यार्थ्यांचे यश
सांगली, ता. १६ महाराष्ट्र राज्य सरकारी आरोग्य विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष बी. एस्सी. ऑप्टोमेट्री परीक्षेत नंदादीप स्कूल ऑफ ऑप्टोमेट्रीच्या शूल उके, श्रुतिका दळवी आणि यशोदा इंगळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना ‘नंदादीप’चे सीनिअर ऑप्टोम सायन मुखर्जी यांचे मार्गदर्शन मिळाले.
नंदादीप स्कूल ऑफ ऑप्टोमेट्रीच्या शिक्षण पद्धतीचा भारत आणि परदेशांत विस्तार करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. भारतातील आणि परदेशातील प्रत्येक ऑप्टोमेट्रिस्टला सर्वोत्कृष्ट शिक्षण आणि प्रशिक्षण मिळते, असे सायन मुखर्जी
म्हणाले. नंदादीप नेत्र रुग्णालयाचा वारसा कायम ठेवण्यास सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सांगली शहराचे नाव देशपातळीवर झळकले, अशा शब्दांत नंदादीप नेत्रालयचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सौरभ पटवर्धन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.