Latest News

Nandadeep Netralay Accredited As Ratnagiris First Fully NABH Accredited Hospital In Excellence In Patient Care And Safety

NABH accreditation- Nandadeep Netralay Ratnagiri

Nandadeep Netralay Accredited as Ratnagiris first Fully NABH Accredited Hospital in Excellence in Patient Care and Safety

नंदादीप नेत्रालय ठरले राष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळवणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले रुग्णालय

रत्नागिरी, ८ जूनः सन २०२० पासून रत्नागिरी येथे कार्यरत असणाऱ्या नंदादीप नेत्रालयाच्या रत्नागिरी शाखेला नुकतेच. भारत सरकारच्या क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया कडून देण्यात येणाऱ्या एनएबीएच (नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल) चे मानांकन प्राप्त झाले आहे. एनएबीएचचे पूर्ण अॅक्रिडिटेशन मिळवणारे नंदादीप नेत्रालय हे रत्नागिरीतील पहिलेच रुग्णालय ठरल्यामुळे, अनेक माध्यमांनी हॉस्पिटलवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
रत्नागिरीतील जनतेच्या विश्वासामुळे व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हि झेप घेणे शक्य झाले आहे असे नंदादीप नेत्रालयाचे डॉ. निकुंज भट्ट यांनी सांगितले आहे. एनएबीएच अॅक्रिडिटेशन हे पेशंट्सची सुरक्षितता आणि त्यांची गुणवत्ता काळजीचे सर्वोच्च प्रमाण मानले जाते. यामध्ये पेशंटची घेतली जाणारी काळजी आणि सुरक्षितता, तपासणीच्या अद्ययावत, बिनचूक आणि माफक दरात दिल्या जाणाऱ्या सोयी, औषधांचे सुव्यवस्थापन, पेशंटना देण्यात येणारी माहिती व तिची पारदर्शकता, हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल, व्यवस्थापनाच्या उपकरणांचे व सुविधांचे व्यवस्थापन, मनुष्यबळ साधनांचे वर्गीकरण व व्यवस्थापन तसेच पेशंटच्या माहिती प्रणालीचे व्यवस्थापन अशा ६०० निकषांवर भारतातील तज्ञांकडून इन्स्पेक्शन केले जाते.
यामध्ये उत्तीर्ण झाल्यावर व गुणवत्तेवर नुकतेच – ‘पेशंटस् ना देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सुविधा, त्यांची घेतली जाणारी काळजी व सुरक्षितता या गुणवत्ता निर्देशकांना अनुसरून, भारत सरकारच्या क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाकडून, सर्वोत्कृष्ट असे एनएबीएच मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले. एनएबीएचमानांकनाने प्रमाणित नंदादीप आय हॉस्पिटलच्या येथील सर्व स्टाफचा वाटा असल्याचे, तसेच जेष्ठ डॉ. प्रमोद. भिडे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. त्यांना डॉ. निकुंज भट्ट व व्यवस्थापिका प्रिती राज यांचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती डॉ. सौरभ पटवर्धन यांनी दिली.