कोल्हापूरच्या बिंदू चौक सबजेलमध्ये नंदादीप आय हॉस्पिटल व जीवनविद्या मिशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
डॉ. दिलीप पटवर्धन यांनी कैद्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि नवे, सकारात्मक जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले.
या शिबिरात कैद्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सकारात्मक जीवन जगण्याचा निर्धार व्यक्त केला.