Latest News

नंदादीप नेत्रालयामध्ये ‘नंदादीप नारी शक्ती सन्मान-२०२२ सोहळा’ उत्साहात संपन्न

Nandadeep Eye Hospital Ratnagiri Times news
नंदादीप नेत्रालयामध्ये ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्तीचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ दे. रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका आणि श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. सोबत नारीशक्ती सन्मानाने गौरविलेल्या रत्नागिरीतील कर्तृत्ववान महिला.
रत्नागिरी, ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदादीप नेत्रायल, रत्नागिरी येथे मंगळवारी ‘नंदादीप नारी शक्ती सन्मान-२०२२’ सोहळा उत्साहात पार पडला. महिलादिनाचे औचित्य साधत पूर्ण मार्च महिना महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी ही योजना सुरु करण्यात आली असून तिला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
महिला दिनाच्यानिमित्ताने ‘नंदादीप नारी शक्ती सन्मान-२०२२’ सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी अनेक क्षेत्रातील कर्तबगार महिला उपस्थित होत्या. यामध्ये दै. ‘रत्नागिरी टाइम्स च्या संचालिका सौ उर्मिलाताई घोसाळकर, उद्योजिका आणि सामाजिक नगरसेविका रशिदा गोदड, जिल्हा सत्र न्यायालयामधील पब्लिक प्रोसिक्शुन अॅड. प्रज्ञा तिवरेकर, आर्या ब्युटी सलोन आणि स्पाच्या मालक आणि सेलिब्रिटी मेकअप आरटीस्ट मेधा कुळकर्णी, प्रख्यात कथक प्रशिक्षक धनश्री मुरकर, अल्पना संसारे, रत्नागिरीतील प्रख्यात आणि नामांकित विलणकर जिमच्या म लिक रुचा विलणकर, कान-नाक-घसा तज्ञ आणि सुप्रसिद्ध सर्जन डॉ. वैभवी व्यास आणि नंदादीपमध्ये झालेल्या पहिल्या शखक्रियेच्या पहिल्या महिला रुग्ण अर्चना मोरे या उपस्थित होत्या. नंदादीपच्या व्यवस्थापिका प्रीती राज, नंदादीपचे सर्जन डॉ. निकुंज भट्ट आणि नंदादीपचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत महिला दिनाचा सोहळा पार पडला. याप्रसंगी सर्व महिलांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.