Latest News

बालिकेला बुब्बुळ प्रत्यारोपणातून मिळाली दृष्टी

Eye Surgery at Nandadeep Eye Hospital
कोल्हापुरात नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये बालिकेवर बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर : गोव्यातील दीड वर्षीय बालिकेच्या डोळ्याला फंगस इन्फेक्शन झाले. त्यातून तिचे बुबुळ पांढरे पडल्याने दृष्टीस थोका निर्माण झाला होता. त्यामुळे तिच्यावर बुबुळ प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता या बालिकेला नंदादीप आप हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे तिच्यावर सोमवारी बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाल्याने तिला पुन्हा दृष्टी मिळाली आहे.
गोव्यातील दीड वर्षीय बालिकेला महिनाभरापूर्वी फंगस इन्फेक्शन झाले, डोळ्याला झालेल्या या संसर्गामुळे तिचे बुबुळ पांढरे पडले. परिणामी तिची एका डोळ्याची नजर गेली होती. पालकांनी बऱ्याच ठिकाणी डोळ्यांवर उपचार केले. अखेरीस पंधरा दिवसांपूर्वी या बालिकेला घेऊन वडील कोल्हापुरातील नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये आले. तिला एका डोळ्यांनी काहीच दिसत नव्हते. तिच्या डोळ्यांची सखोल तपासणी करता काही दिवसांपूर्वी तिच्या डोळ्यांना फंगस इन्फेक्शन झाल्याचे निदान समोर आले. त्यातून तिचा संपूर्ण डोळा, बुबुळ पांढरे पडल्याने निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी उपचाराबाबत पालकांना माहिती दिल्यानंतरही पालक आशावादी राहिले.
नंदादीप हॉस्पिटलमधील बुबुळतज्ज्ञ डॉ. प्रसन्न आराध्ये यांनी बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी बालिकेचे पांढरे परवानगी दिली. यावेळी पडलेले बुब्बुळ शोध घेत असताना दान केलेले बुबुळ उपलब्ध झाले. सोमवारी तिच्यावर बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. आराध्ये यांनी केली. त्यासाठी त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. शशिकांत सांगावकर यांच्यासह स्टाफचे सहकार्य लाभले. कोल्हापुरात दीड वर्षाच्या बालिकेवर प्रथमच बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे
बालिकेला पुन्हा मिळणार ७० टक्के दृष्टी…
वर्षभरापूर्वी या बालिकेच्या डोळ्याला खरचटून जखम झाली होती. गोव्यातील एका हॉस्पिटलमध्ये यावर उपचार करण्यात आले. पण डोळ्यातील जखम पूर्ण बरी झाली नाही ती आतून वाढली, त्यामध्ये फंगस इन्फेक्शन झाले. त्यामुळे तिचे बुबुळ पूर्णपणे पांढरे पडले. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी तिला एका डोळयाने दिसणार नसल्याचे सांगितले. कोल्हापुरात तिच्या डोळ्यांची सोनोग्राफी केली. यावेळी बुबुळ प्रत्यारोपणातून तिला पुन्हा दृष्टी मिळेल हा आशेचा किरण दिसला. बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे भविष्यात तिला ७० टक्के दृष्टी निश्चितच मिळेल, असा विश्वास बुबुळतज्ज्ञ डॉ. प्रसन्न आराध्ये यांनी व्यक्त केला.