Latest News
"नंदादीपचा संकल्प – जीवनदानासाठी अवयवदान!"
नंदादीप नेत्रालयातर्फे “अवयवदान जनजागृती अभियान २०२५” ला डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
|| मरावे! परी देह अन अवयव रुपी उरावे || या विचारावर आधारित या मोहिमेतून अवयव व नेत्रदानाचे महत्त्व समजावले जात आहे.
एक व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर अनेकांना नवं जीवन देऊ शकतो — ही भावना समाजात बिंबवण्याचा नंदादीपचा हेतू आहे.
‘वन नेशन – वन क्यूआर’ प्रणालीद्वारे नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि शंकानिवारण सत्रेही घेतली गेली.
या उपक्रमाचा भाग म्हणून नंदादीप स्कूल ऑफ ऑप्टोमेट्रीच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून जागृती केली, ज्यातून समाजप्रबोधनाचा व्यापक संदेश दिला गेला.
"अवयवदान करण्यासाठी"
लिंकवर क्लिक करून किंवा QR स्कॅन करून तुम्ही “National Organ & Tissue Transplant Organization” या अधिकृत वेबसाइटवर पोहोचाल.
तेथे तुम्हाला “Register for Pledge” हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडेल.
तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करायची आहे.
त्यानंतर आवश्यक माहिती भरून तुम्ही तुमचा Organ Donation Pledge पूर्ण करू शकता.
- Pledge फॉर्म भरताना Name of Institution / NGO या पर्यायामध्ये कृपया ‘नंदादीप नेत्रालय’ किंवा ‘Nandadeep Eye Hospital’ असे नमूद करावे.
