Latest News
नंदादीप मध्ये 26 वर्षीय मधुमेहग्रस्ताची दृष्टी परत
डॉ. सौरभ पटवर्धन यांच्या प्रयत्नांना यश सांगली : पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वी २६ वर्षीय तरुणी दृष्टी कमी झाल्यामुळे नंदादीप नेत्रालयमध्ये दाखवण्यासाठी आली होती. तिच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली असता लक्षात आले की ही तरुणी गेल्या सोळा वर्षापासून मधुमेहाने ग्रस्त आहे. यामुळे या तरुणीला कमी वयामध्ये मोतीबिंदू झाला होता. त्यावर नंदादीप नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सौरम पटवर्धन यांनी तिचे मोतीबिंद्धी शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. खूप वर्षापासून मधुमेहाने ग्रस्त असल्यामुळे या तरुणीच्या डोळ्यांच्या पडयांवर परिणाम झाले होते. मधुमेह अनियंत्रित असल्यामुळे या तरुणीच्या पडयांना सूज आली होती. त्यामुळे तरुणीच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. डॉ. पटवर्धन यांनी पडद्यांवर प्राथमिक तपासणी केल्यानंतर तरुणीला पडद्यावरील इंजेक्शन देण्याचे निर्णय घेतला. या इंजेक्शन उपचारानंतर या तरुणीची दृष्टी वाचवण्यात यश आले.
For an appointment call us at – +91- 92 2000 1000.