Latest News

नंदादीप नेत्रालयात मोफत नेत्र तपासणी – महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

  • महिला दिनाच्या निमित्ताने नंदादीप नेत्रालयात समाजातील कर्तृत्ववान महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत अनेक महिलांनी नेत्र आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
  • शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीसह मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांच्या तक्रारींसाठी सल्ला देण्यात आला.
  • महिलांच्या नेत्र आरोग्यासाठी नंदादीप नेत्रालयाच्या विशेष मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.
  • हा उपक्रम समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि त्यांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने घेण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.