नंदादीप रत्नागिरीमध्ये तिरळेपणावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
रत्नागिरीतील नंदादीप नेत्रालयात पहिल्यांदाच डोळ्यांच्या तिरळेपणावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
सुप्रसिद्ध स्क्विंट स्पेशालिस्ट डॉ. सिद्धार्थ केसरवानी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही तीन रुग्णांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया कोकणातील नेत्रउपचारात नवा माइलस्टोन ठरली आहे.
या यशामुळे तिरळेपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आता स्थानिक पातळीवर अत्याधुनिक व सुरक्षित उपचार मिळणार आहेत.