Latest News जतमध्ये ज्येष्ठांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर नंदादीप हॉस्पिटल, जत येथे ज्येष्ठ नागरिक संघ व पेंशनर्स असोसिएशनच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभाग घेतला. डॉ. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीपणे पार पडले. यामध्ये मोफत तपासणीसह शस्त्रक्रियेबाबत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.