Latest News

मोफत नेत्र तपासणी शिबिर नंदादीप, तनीष्का व फिटनेस बडी यांचा स्तुत्य उपक्रम

  • मोरेवाडी, २५ मार्च २०२५: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तनीष्का, नंदादीप नेत्रालय आणि फिटनेस बडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.
  • शिबिरात डॉ. निलेश मोहिते, डॉ. संमिता राठेटेक्निशियन विक्रम पांडे यांनी रुग्णांची तपासणी केली. योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्यास नेत्र आरोग्य सुधारते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
  • या उपक्रमातून ५३ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. विशेषतः महिलांसाठी हा उपक्रम लाभदायी ठरला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल गौरी पाटील, उमा ठक्कर, संध्या पाटील, स्वेता पाटील, अर्चना हलसावार, नंदा खांडेकर, संगीता पाटील, जयश्री पाटील आदींनी विशेष योगदान दिले.
  • नंदादीप नेत्रालय व तनीष्का यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.