Latest News

नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये तरुणावर व्हिजन थेरपी यशस्वी

Successful vision therapy at Nandadeep Eye Hospital
सांगली : नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये एका तरुणावर व्हिजन थेरपी यशस्वी केली. याबाबत माहिती अशी की, एका वीस वर्षीय तरुणास गंभीर डोकेदुखी आणि अधूनमधून दृष्टी धूसर होण्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासात अडथळा येत होता. याबाबत त्याने नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन घेतले. त्याच्यावरती व्हिजन थेरपी केली असता त्याच्या दृष्टीमध्ये सुधारणा झाली. याबाबत सांगण्यात आले की, रुग्णालयात केलेल्या विविध चाचण्यांमधून रुग्णाला डोळ्यांमध्ये स्नायूंचा कमकुवतपणा असण्याचे निदान झाले. ऑप्टोमेट्री डिपार्टमेंटचे प्रमुख सायन मुखर्जी यांनी व्हिज- थेरपी करण्याचा निर्णय घेतला. त्यांन मनिदिपा बसक यांची मदत लाभली व्हिजन थेरपीनंतर या तरुणाची डोकेदुख आणि इतर संबंधित तक्रारी दूर झाल्या तो पुन्हा त्याच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकला.
याबाबत संचालक डॉ. सौरभ पटवर्धन म्हणाले, डोळ्यांचे काह आजार व्हिजन थेरपी व्यायामाच्या मदतीने बरे होऊ शकतात. नंदादी आयच्या विविधशाखांमध्ये आजअखे पाच हजारांवरील रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

Mahadevi memorial hospital व नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या वतीने 24/08/22 रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये सुमारे 175 जणांनी तपासणी केली आहे.