Latest News
नंदादीप नेत्रालयतर्फे विमेन्स मंथ उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नंदादीप नेत्रालयातर्फे आयोजित केलेल्या महिलांकरिता ‘विमेन्स मंथ’ उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वयंसिद्धा भगिनी संस्थेच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर, तर अध्यक्षस्थानी माण देशी फौंडेशन कॉमर्स विभागाच्या स्मिता मुळे व शिवाली दामुगडे उपस्थित होत्या.
महिला दिनाचे औचित्य साधून केवळ एका दिवसासाठी नव्हे, तर महिनाभरासाठी नंदादीपच्यावतीने ‘विमेन्स मंथ’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये १ ते ३१ मार्च कालावधीत सर्व महिलांची नेत्र तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच चष्म्यावर सवलत देण्यात येणार आहे.
सौम्या तिरोडकर म्हणाल्या, घर, नोकरी, व्यवसाय सर्व सांभाळताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘नंदादीप’ने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून केवळ एका दिवसासाठी नव्हे, तर महिनाभरासाठी नंदादीपच्यावतीने ‘विमेन्स मंथ’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये १ ते ३१ मार्च कालावधीत सर्व महिलांची ‘नंदादीप’चे डॉ. प्रसन्न आराध्ये यांनी या उपक्रमाची माहिती सांगितली. नेत्रपटलतज्ज्ञ डॉ. सचिन देसाई यांनी डोळ्यांच्या आरोग्याचे महत्त्व सांगितले. मयूरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नंदादीप कोल्हापूरचे व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांनी आभार मानले. (वा.प्र.)