Nandadeep Netralay

मुलांना चष्मा लागलाय? काय करावे? Mulanna Chashma Lagla? kay karave?



मुलांना चष्मा लागलाय? काय करावे? Mulanna Chashma Lagla? kay karave ?

#मलन #चषम #लगलय #कय #करव #Mulanna #Chashma #Lagla #kay #karave

या व्हिडिओमध्ये मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याबद्दल बोलले आहे, विशेषतः जेव्हा त्यांना चष्मा लागतो. पालकांनी समजून घ्यावे की चष्म्याचा नंबर वाढणार आहे का आणि चष्मा वापरण्यामुळे काही धोके आहेत का. दृष्टी आणि चष्म्याचा नंबर यामध्ये फरक असतो; जर चष्मा वापरल्याने दृष्टी 100% असेल, तर चिंता करण्याची गरज नाही, पण नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांचे डोळे पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या वर्षी तपासणे आवश्यक आहे, आणि पाचव्या वर्षानंतर दरवर्षी तपासणी करणे आवश्यक आहे. पालकांनी त्यांच्या मुलांचा नंबर वाढू नये यासाठी चांगला आहार देणे आणि बाहेर खेळायला प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ पालकांना त्यांच्या मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी मदत करतो, जेणेकरून त्यांची दृष्टी चांगली राहील.

In this video, we discuss how to take care of children’s eyes, especially when they need glasses. Parents should know if their child’s glasses prescription will change and if there are any risks. If glasses help a child see 100% clearly, there’s usually no need to worry, but regular eye check-ups are important. It’s good to check children’s eyes when they are 1, 3, and 5 years old, and after that, they should have an eye exam every year. Parents can help keep their child’s prescription from getting worse by giving them healthy food and encouraging them to play outside. This video helps parents learn how to take care of their children’s eyes to keep their vision healthy.

#ChildEyeHealth #Myopia #nandadeepeyehospital #Eyecare #Vision #Glasses #EyeHealth #KidsEyes #Optometry #HealthyEyes #eyecheckup
timestamps
00:00 Teaser
00:15 Intro
00:38 चष्मा वाढत राहणार का? की पुढे काही धोका आहे का?
02:35 चष्मा घालवता येतो का?
05:27 मुलांना दिसण्यात काही प्रॉब्लेम नसेल, तर डोळ्यांची तपासणी करायला हवी का?
07:00 लहान मुलांचे नंबर चेक करण्याची पद्धत काही वेगळी असते का?
09:59 चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी पालक काय करू शकतात?

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

माझे मुलांना आत्ताच चश्मा लागलेला आहे तर आता मी खूप घाबरलेले आहे की आता पुढे काय होणार त्याचा म्हणजे चश्मा वाढत राहणार की तिच्यापुढे काय धोका आहे पालक काय करू शकते की त्यांचे मुलांचा नंबर स्टेबल राहील जास्त वाढू [संगीत] नये नमस्कार ज्या पालकांचे मुलांना आत्ता चश्मा लागलेला आहे त्यांचे मनात बरेच प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर आपण डॉक्टर सौरभ कडून घेऊया डॉक्टर सौरभ मी एक पालक आहे आणि माझे मुलांना आत्ताच चश्मा लागलेला आहे तर आता मी खूप घाबरलेले आहे की आता पुढे काय होणार त्याचा म्हणजे चश्मा वाढत राहणार की तिच्यापुढे काय धोका आहे तर ते तिच्याबद्दल तुम्ही काय सांगता आजकाल असं बऱ्याचदा होतं की मुलांचे पालक पहिल्यांदा त्यांना असं जाणवायला की मुलांना काहीतरी दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे ते जनरली प्रॉब्लेम्स काय असतात की टीव्ही बघताना मुलगा फार किंवा मुलगा मुलगी जवळ खूप जायचा प्रयत्न करत किंवा डोळे बारीक करून बघायचा प्रयत्न करत किंवा काही वाचायचं असेल तरी ते फार जवळ धरून बघायचा प्रयत्न करतात किंवा शाळेतून तक्रार येते की मुलगा अभ्यासात लक्ष देत नाहीये बहुतेक त्याला दिसण्यात प्रॉब्लेम असावा तर असं लक्षात आल्यावर मग हे पालक आपल्या मुलांना घेऊन डोळ्याच्या चेकअप साठी येतात आणि चेकअप मध्ये ते असं आढळून येतं की त्यांना डोळ्याचा थोडासा नंबर लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना लांबचं दिसण्यात किंवा जवळचं दिसण्यात त्रास होतोय तर हे ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा त्यांना सांगतो तर साहजिकच सगळ्याच पालकांना एक थोडासा धक्का बसतो कारण इतके दिवस मुलाला काही डोळ्याचा दोष नसतो आणि अचानकच आता आपल्या मुलाला किंवा मुलीला चश्मा लागणार आहे आणि तो सतत घालावा लागणार आहे हे ज्यावेळी डॉक्टरांकडून त्यांना कळतं त्यावेळी त्यांना पहिल्यांदा वाटतं की अरे बापरे आपल्या मुलांना हे काय झालाय किंवा हा कुठला आजार झालाय तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावसं वाटतं की डोळ्याला नंबर लागणं हा काही खूप धोकादायक किंवा खूप मोठा आजार नाहीये त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही रिलॅक्स व्हा असे कुठलाही खूप टेन्शन घ्यायची गरज नाहीये की हा आजार आपल्याला जो नंबरचा लागलेला आहे तो आपल्याला ठीक करता येतो त्याला बरेच उपचार उपाय सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्याविषयी तुम्ही आपल्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घ्या तर मुळीच घाबरून जाऊ नका त्याला आपण पुढे काय ट्रीटमेंट करणार आहे त्याची आपण माहिती घेऊया चश्मा पुढे काढता येते का हा एक बऱ्याचदा पहिलाच प्रश्न असतो म्हणजे ज्यावेळी मुलाला नंबर लागलाय आणि आता आम्ही अजून चश्मा सुद्धा त्यांना त्या मुलाला किंवा मुलीला दिलेला नाहीये पण पहिला आपल्या मनात प्रश्न येतो की अरे हा आता लागला चश्मा खरा पण आता याला काहीतरी कायमचा उपचार तरी पाहिजे म्हणजे सारखा काय आपला मुलगा किंवा मुलगी चश्मा घालून बसणार का तर ते एका अर्थी बरोबर आहे कारण कुणालाच आपल्या मुलाला किंवा मुलीला चश्मा घालून बघायची पहिल्यांदा सवय नसते किंवा असं बघितलेलं आवडत नाही लहान मुलांचा जो नंबर असतो तो आपल्याला त्याच वयामध्ये काढून टाकता येत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण लहान वयातील चश्म्याचा नंबर हा हळूहळू चेंज होत जाणार असतो ज्यावेळी तो नंबर स्थिर होतो जो जनरली 18 वर्षाच्या वयानंतर स्थिर झालेला असतो त्यावेळी आपण मात्र लेझर उपचार लेन्सच्या साह्याने हा नंबर घालवून टाकू शकतो त्यामुळे त्याची तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही नाही पण त्याला अजून वेळ आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या मुलाचं जी दृष्टी आहे ती व्यवस्थित राहणे हे फार महत्त्वाचं आहे आता दृष्टी आणि चश्म्याचा नंबर हा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे अगदी पहिल्यांदा समजून घ्या दृष्टी म्हणजे ज्यावेळी आपण चश्मा व्यवस्थित त्या मुलाला किंवा मुलीला देतो त्यानंतर आम्ही जो चार्ट दाखवतो त्याला तर त्याच्यामध्ये त्या मुलांना जर पूर्ण दिसत असेल अगदी शेवटच्या लाईन पर्यंत तर त्याला आम्ही म्हणतो की मुलाची किंवा मुलीची दृष्टी एकदम योग्य आहे किंवा 100% आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की चश्म्याचा नंबर काय आहे ते सांगा आम्हाला तर पहिला आधी तुम्ही विचारा की माझ्या मुलाची दृष्टी तर ठीक आहे ना कारण शेवटी प्रॅक्टिकली दृष्टी चांगली असणं हे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या भवितव्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बरोबर चश्म्याचा नंबर हा सेकंडरी पार्ट आहे दुसरा पार्ट आहे सो दृष्टी चांगली असते असू शकते जरी चश्म्याचा नंबर असला तरी हे सगळ्यात महत्त्वाचं काही मुलांना चश्म्याचा नंबर जास्त असला तरीसुद्धा दृष्टी ही चांगली असू शकते परंतु काही मुलांना चश्म्याचा नंबर असतो आणि त्याच्याबरोबर दृष्टी सुद्धा काही वेळा कमी असते आता हे दृष्टी कमी असण्याची बरीच कारण असतात ओके तर त्याविषयी आम्ही मग पुन्हा त्याच्यामध्ये डायग्नोसिस करतो की कशामुळे या मुलाला दृष्टी कमी आहे चश्म्याचा नंबर इतके वर्ष न वापरल्यामुळे ती दृष्टी कमी राहिली आहे का किंवा इतर काही डोळ्याचे आजार आहेत का का बुबुळाचा काही आजार आहे का लेन्सचा किंवा मोतीबिंदूचा आजार आहे का पडद्याचा किंवा नसेचा काही आजार आहे का हे सगळे आम्ही त्यानंतर चेकअप करतो आणि ह्या सगळ्या चेकअप नंतर आपल्याला लक्षात येतं की या मुलाची दृष्टी या कारणामुळे कमी आहे आणि मग त्याला आपल्याला काही उपचार करतात ते पाहतो पण जर तुमच्या मुलाची दृष्टी 100% असेल चश्म्याच्या सहाय्यानं तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही आपल्याला फक्त रेग्युलर फॉलो अप करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता माझी फॅमिलीमध्ये अजून पण मुलं आहे त्यांना दिसायला असं काही प्रॉब्लेम नाही वाटत मग त्यांचा पण चेकअप करायला पाहिजे का येस सगळ्यात पहिल्यांदा तर ऍक्च्युली लहान मुलांचा जो डोळ्याचा चेकअप आहे तो डब्ल्यू एचओ ने आपल्याला एक गाईडलाईन दिलेली आहे की पहिल्या वर्षी नंतर तिसऱ्या वर्षी आणि पाचव्या वर्षी लहान मुलं यांचा डोळ्याचा चेकअप म्हणजे जनरल चेकअप करणे हे फार महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा लहान वयात मुलांना जरी नंबर असला तरी तो चेकअप नाही केला तर कळून येत नाही आणि त्याच्यामुळेच आळशी डोळा किंवा दृष्टी कमी राहण्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्या वर्षी तिसऱ्या वर्षी आणि पाचव्या वर्षी तुम्ही आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच मुलांना किंवा पालकांना सांगा की तुमच्या मुलांच्या डोळ्याचा चेकअप करून घ्या आणि पाचव्या वर्षानंतर दरवर्षी नियमितपणे डोळ्याचा चेकअप करून घेणे फार महत्त्वाचं आहे आजकाल बऱ्याचदा स्कूल स्क्रीनिंग सुद्धा होत असतात तिथे स्कूलमध्ये जाऊन वेगवेगळ्या संस्था आहेत ते जाऊन मुलांचे डोळे किंवा दृष्टी चेक करत असतात पण अर्थात जागरूक पालक यांनी लक्षात ठेवा की त्यांनी स्वतः डोळ्याच्या डॉक्टरांकडून जर दरवर्षी जाऊन आपल्या मुलाचे डोळे चेक करून घेतले ज्याच्यामध्ये दृष्टी सुद्धा चेक होते त्याचा जर नंबर असेल तर तोही चेक होतो तर त्याच्यामुळे पुढे होणारे दृष्टी दोष हे आपण टाळू शकतो त्यामुळे सगळ्याच मुलांना अशी म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या कुटुंबात जर कोणाला नंबर लागला असेल तर अर्थातच चेक करूनच घ्यावेत कारण थोडासा अनुवंशिकता त्याचा भाग सुद्धा याच्यामध्ये असतोच कारण जर आपल्या पालकांना जर नंबर असेल तर मुलांना होणार येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते माझा पुढचा प्रश्न हे आहे की मुलांचे नंबर चेक करायची पद्धत त्याच्यामध्ये काय वेगळं असतंय का म्हणजे अडल्ट्स पेक्षा येस येस आणि हे महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच म्हणजे ज्यावेळी पालक मुलांना घेऊन येतात तर त्यांना असं दिसतं की त्यांचा नंबर किंवा मोठ्या लोकांचे नंबर आपण लगेच काढतो की पाच दहा पंधरा मिनिटात नंबर निघतो आणि आपण त्यांना देऊन टाकतो आणि ज्यावेळी मुलांचा नंबर काढायचा वेळ होते त्यावेळी काही वेळा त्यांना फार वेळ लागतो म्हणजे आम्ही काही वेळा त्यात औषध घालतो परत चेक करतो काही वेळा परत तपासणीसाठी बोलवतो आणि यामध्ये बराच वेळ पण जातो काही लोकांना असं वाटतं की अरे काय इतका का वेळ जातोय म्हणजे लवकर करून द्यायला पाहिजे डॉक्टरांनी तर लहान मुलांच्या जे नंबर तपासणीची पद्धत आहे त्याचे काही गाईडलाईन्स ऑलरेडी सेट आहेत ओके ज्यावेळी आपण प्री व्हर्बल एज ग्रुप म्हणतो म्हणजे ज्यामध्ये मुलांना व्यवस्थित सांगता येत नाही की मला हे दिसतंय हे दिसतंय म्हणजे समजा आपण ए बी सी डी चे आर्ट दाखवतो त्यांना वस्तू दाखवतो तर ते बऱ्याच लहान मुलांना सांगता येत नाही करेक्ट तर अशा वेळी नंबर जो चेकअप असतो तो आपल्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट वर अवलंबून असतो म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही रेटिनोस्कोपी करतो ऑटो रिफ्रॅक्टोमीटर रीडिंग घेतो आणि त्यानंतर त्याच्यावर बेस्ट आम्ही मुलाला नंबर देत असतो त्यामुळे आम्हाला जास्त ऍक्युरेट होणं हे फार महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये आपल्या डोळ्याचे आतले जे स्नायू असतात ज्याला आम्ही सिलेरी मसल्स म्हणतो तर हे खूप ऍक्टिव्ह असतात ज्याला आपण अकोमोडेशन पण म्हणतो म्हणजे फोकसिंग ची पावर ही लहान मुलांमध्ये ऍडल्ट्स पेक्षा खूप जास्ती असते त्यामुळे ही जर आपण अकोमोडेशन कमी नाही केलं त्या मुलाचं तर नंबर हा चुकीचा निघू शकतो आणि म्हणून हे अकोमोडेशन रिलॅक्स करण्यासाठी आम्हाला काही वेळा त्या मुलाला औषध किंवा ड्रॉप्स घालावे लागतात किंवा काही वेळा मलम द्यावे लागतं आणि यानं डोळ्याचे स्नायू ज्यावेळी रिलॅक्स होतात म्हणजे बाहुली मोठी होते त्यावेळी आम्ही नंबर चेक करतो त्या मुलाचा आणि ज्यावेळी नंबर हा चेक झाल्यानंतर ज्यावेळी आम्हाला लक्षात येतं की औषध घातल्यानंतरचा नंबर आणि आधीचा नंबर यामध्ये जास्त फरक आहे तर अशा वेळी अशा मुलांना आम्ही परत काही दिवसांनी बोलवतो परत नंबर कन्फर्म करण्यासाठी की औषधाचा इफेक्ट नसताना मुलाला कुठला नंबर योग्य वाटतो आणि त्यानुसार आम्ही त्याला नंबर देतो त्यामुळे काही वेळा या डोळ्याच्या नंबर चेकअप साठी दोन विजिट ची गरज असू शकते काही मोठ्या मुलांना मात्र एका विजिट मध्ये सुद्धा आम्ही नंबर देऊ शकतो बऱ्याच मुलांना ज्यांना पहिल्यांदाच नंबर लागला हे आमच्या लक्षात येतं त्यावेळी ही तपासणी जास्त काटेकोरपणे केली जाते जसा मुलांचा फॉलोअप होतो तसा आम्ही त्या मुलाची गरज कुठला नंबर आहे आणि गाईडलाईन्स काय आहेत त्यानुसार मग नंबरचा चेकअप करतो काही केसेस मध्ये जसा ज्यांना प्लस नंबर असतो ज्यांना खूप मायनस नंबर असतो अशा वेळी काही वेळा दरवेळी दरवर्षी आम्हाला औषध घालून तपासणी करणे गरजेचं असू शकतं पालक काय करू शकते की त्यांचे मुलांचा नंबर स्टेबल राहील जास्त वाढू नये येस सो आता या नंबरचे थोडक्यात मी प्रकार सांगतो आणि त्यानुसार काय काय काळजी घ्यायची ते सांगतो सगळ्यात कॉमन जो नंबर लागतो तो आहे मायनस नंबर ओके ज्याला मायोपिया सुद्धा म्हणतात या नंबर मध्ये वयानुसार नंबर वाढण्याची टेंडन्सी असते आणि हे थांबवण्यासाठी पालकांना काही गोष्टी ते करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचे आउटडोर ऍक्टिव्हिटीज वाढवा म्हणजे जवळजवळ दर दिवशी जर ते 30 टू 45 मिनिट सनलाईट मध्ये जर आउटडोर ऍक्टिव्हिटीज करू शकत असतील तर त्याच्यामुळे नंबर वाढायचा वेग थांबतो त्याला काही ड्रॉप सुद्धा तुमचे डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात आणि याला काही स्पेसिफिक मायोपिया वाढू नये प्रोग्रेशन होऊ नये यासाठी जे स्पेक्टॅकल सुद्धा उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला डॉक्टर किंवा ऑप्टोमेट्री देतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता जर आपल्या मुलाला प्लस नंबर असेल ओके ज्याला आम्ही हायपरमेट्रोपिया म्हणतो हायपरमेट्रोपियाचा एक ऍडव्हांटेज थोडासा असा असतो की लहान वयातला हायपरमेट्रोपिया वयानुसार हळूहळू कमी होत जातो अर्थात लगेच नाही पण तो काही वर्षांनी हळूहळू कमी होऊ शकतो पण तेवढ्या काळ मात्र चश्म्याचा नंबर वापरणे हे गरजेचं असतं पण प्लस नंबर वर अजून एक अडचण असू शकते की काही मुलांना हा जर चश्मा लावला नाही तर तिरळेपणा असू शकतो अशा वेळी हा चश्मा सतत वापरणं हे फार महत्त्वाचं असतं ओके हे एक सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात नंबर लागलेल्या मुलांसाठी की चश्मा सतत वापरला पाहिजे फक्त काही गोष्टींसाठी साठी वापरणं चश्मा आणि इतर वेळी नाही वापरणे हे बरोबर नाही तिसऱ्या टाईपचा नंबर असतो त्याला एस्टिगमॅटिजम म्हणतो आम्ही हा एस्टिगमॅटिजम जो असतो हा बऱ्याचदा लहानपणापासून मुलांच्या डोळ्यांमध्ये असतो किंवा बुबुळांमध्ये असतो आणि हा बऱ्याचदा स्थिर राहत असतो बरेच काळ बऱ्याच वर्ष त्यामुळे जर मुलालाम असेल तर आपल्याला हे पाहावं लागतं की हा नंबर वाढत तर नाही ना तसेच बुब्याचे आम्ही काही वेळा स्कॅन्स करतो हे पाहण्यासाठी की त्याला कॅरेटोकोनस नावाचा आजार तर नाही ना ज्याच्यामध्ये हा झपाट्याने वाढू शकतो वाढू नये म्हणून मुलांना डोळे चोळणं टाळावं काही मुलांना ऍलर्जी असेल तर ती औषधांनी कंट्रोल करून घ्यावी लागेल पण काही लोकांना हॅबिच्युअल रबिंग असतं म्हणजे सवयीने ते डोळे चोळत असतात तर हे मुलांना टाळायला सांगावं याच्यामुळे नंबर वाढण्याचा वाढण्याचा हे त्रास किंवा धोका कमी होतो अर्थात या सगळ्या प्रश्नांशिवाय सुद्धा तुम्हाला काही आणखी प्रश्न पडले असतील तर जरूर तुम्ही आमच्या कॉमेंट्स मध्ये लिहू शकता आणि त्याचे जरूर आम्ही उत्तर कॉमेंट्स मध्ये देऊ किंवा याच्याविषयी आणखी व्हिडिओ द्वारे सुद्धा तुमच्यासमोर आम्ही माहिती मांडू तर सगळ्यात शेवटी आय थिंक मला वाटतं एक तुम्हाला सगळ्याच पालकांना हा संदेश आहे की जर आपल्या मुला-मुलीला जर चश्माचा नंबर लागला असेल तर घाबरून जायचं मुळीच कारण नाही त्याच्याविषयी उपचार उपलब्ध आहेत चश्मा लावणं किंवा चश्मा वापरणं हे फार महत्त्वाचं आहे मुलाच्या दृष्टीसाठी आणि मी सांगितलं असं दृष्टी हे नंबर किंवा चश्म्याचा नंबर किती आहे या पेक्षा जास्त महत्त्वाची आहे तर त्याच्यावर आपण फोकस करूया आणि अर्थात वयाचे 18 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे हा नंबर आपण कायमचा सुद्धा काढून टाकू शकतो धन्यवाद

source